Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE: आरएसएसचा परिसर दिव्यांनी सजला

| Updated on: Jan 23, 2024 | 7:44 AM

PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : आज 22 जानेवारी 2024. अयोध्येतील राम मंदिरात उद्या सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही. देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत. या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट वाचा...

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE: आरएसएसचा परिसर दिव्यांनी सजला
Follow us on

अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | अयोध्येत प्रायश्चित्त पूजनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारी सुरुवात झाली. रविवारी सकाळी मध्याधिवास तर संध्याकाळी शय्याधिवास होणार आहे. त्यानंतर आज २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी अयोध्या नववधूसारखी सजली आहे.  या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला या सोहळ्याचे निमंत्रण आले आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी नागपूर मेट्रोतर्फे तिकीट दरात ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. राम मंदिर सोहळ्यानिमित्त राज्यातील, देशातील आणि विदेशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jan 2024 08:33 PM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दिवे

    नागपूर | अयोध्येत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. राम मंदिरात विराजमान झाले. त्याचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. संघ मुख्यालय कार्यालयाच्या बाहेर दिवे लावण्यात आले. परिसर पूर्ण सजवण्यात आला आहे.
    दिव्याच्या माध्यमातून श्रीराम लिहिण्यात आलं आहे.

  • 22 Jan 2024 07:09 PM (IST)

    Amruta Fadnavis | आज मला ट्रोल व्हायचं नाही, अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?

    पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर अमृता फडणवीस या त्यांच्या गोड गळ्यासाठी आणि गायनसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. रामल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांच्याकडे गाण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळेस त्यांनी ट्रोर्ल्सच्या भीतीने आणि आवाज खराब असल्याचं सांगत नकार दिला. “मी आज गाणं म्हणणार नाही. आज माझ आवाज खराब आहे. आज मला ट्रोल व्हायचं नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.


  • 22 Jan 2024 06:52 PM (IST)

    मला शंकरजी मंदिरात दर्शन घेण्यापासून रोखण्यात आले: राहुल गांधी

    आसाममध्ये ‘भारत जोडो न्याय’ लाँच करणाऱ्या राहुल गांधींनी म्हटले आहे की, शंकर देवजींनी भारतातील सांस्कृतिक विविधतेला भक्तीच्या माध्यमातून एकतेच्या धाग्यात बांधले होते, पण आज मला त्यांच्या जागी नतमस्तक होण्यापासून रोखण्यात आले. मी मंदिराच्या बाहेरून देवाला नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. सत्तेविरुद्ध सन्मानाचा हा संघर्ष आम्ही पुढे नेऊ.

  • 22 Jan 2024 06:40 PM (IST)

    अयोध्येसाठी खूप भावनिक क्षण, इथे येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे : चिराग पासवान

    लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (रामविलास) चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, अयोध्येत खूप भावनिक क्षण होता. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज इथे येण्याची संधी मिळाली.

  • 22 Jan 2024 06:34 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी तीरी आरती

    उद्धव ठाकरे गटाकडून काळाराम मंदिरात दर्शन घेण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रश्मी ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी तीरी आरती करण्यात आली.

  • 22 Jan 2024 06:25 PM (IST)

    19 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येणार

    19 मुलांना त्यांच्या असामान्य क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी सन्मानित केले जाईल. शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या प्रत्येक श्रेणीत एका मुलाचा समावेश करण्यात आला आहे.

  • 22 Jan 2024 06:09 PM (IST)

    रामज्योती पेटवून तुमच्या घरी रामललाचे स्वागत करा: पंतप्रधान मोदी

    आज रामलला अयोध्या धाममधील त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान आहेत. या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना विनंती करतो की त्यांनी राम ज्योती प्रज्वलित करून त्यांचे घरोघरी स्वागत करावे. जय सिया राम!

  • 22 Jan 2024 05:55 PM (IST)

    शरयूच्या तीरावर आणि राम की पहिली परिसरात हजारो दिव्यांची रोषणाई

    अयोध्या : शरयूच्या तीरावर आणि राम की पहिली परिसरात हजारो दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. हजारो दिव्यांची आरास करून प्रभू श्रीरामाचं नाव घेत खऱ्या अर्थाने आज अयोध्यात दिवाळी साजरी केली जातेय. विविध रांगोळ्या काढून त्यावर दिवे ठेवून हा दिपोत्सव साजरा होतोय. शरयू नदीजवळ असलेल्या राम की पौडीचा पूर्ण परिसर या दिव्यांच्या रोषणाईने उजळून गेलाय.

  • 22 Jan 2024 05:35 PM (IST)

    उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दाखल, सह कुटुंब केली पूजा

    नाशिक : उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी काळारामाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. तेजस ठाकरे हे ही मंदिरात पोहचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात सहकुटुंब पूजा केली.

  • 22 Jan 2024 05:30 PM (IST)

    त्या अधिकारी, मंत्र्यांना तुरुंगात टाकणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा

    नाशिक : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे पेपर फोडून त्यांचे नुकसान करणाऱ्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री आता तरी फासावर चढविणार आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. २०२४ हे परिवर्तनाचे वर्ष आहे. आत्तापर्यंत ‘अच्छे दिन’ आले नाहीत. मात्र, हे खोके सरकार पाडून आमचे सरकार राज्यात येईल. गुजरातच्या सांगण्यावरून ज्या अधिकारी, मंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले त्यांना तुरुंगात टाकणार. महाराष्ट्र त्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

  • 22 Jan 2024 05:17 PM (IST)

    अकरा लाख लाडूंचा एक लाडू, देवेंद्र फडणवीस यांनी केले अनावरण

    अमरावती : अमरावती येथे राणा दाम्पत्यांच्या वतीने अकरा लाख लाडूंचा एक लाडू बनविण्यात आला आहे. हनुमान गढी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. या लाडूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते कार सेवेकांचा सत्कार केला जाणार आहे.

  • 22 Jan 2024 05:08 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना नोटीस

    नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना नोटीस जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे एकनाथ शिंदे यांना त्यांचे म्हणणे सादर करावे लागेल. सर्वोच्च न्यायालय त्यांची बाजू ऐकून घेईल. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवावे किंवा उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घ्यावे यावर निर्णय होईल. यासंदर्भातली पुढची सुनावणी पंधरा दिवसांनी होईल. निश्चित तारीख आत्ताच सांगता येणार नाही अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

  • 22 Jan 2024 04:45 PM (IST)

    उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार

    उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिक दौऱ्यात उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी गोदघाटावर जाऊन उद्धव ठाकरे सपत्नीक महाआरती करणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार

  • 22 Jan 2024 04:30 PM (IST)

    डॉ. उल्हास पाटील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित

    जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा खासदार डॉ. उल्हास पाटील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई केली आहे.

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना  निलंबनाचे पत्र देण्यात आलं आहे. एकाचवेळी काँग्रेस मधील तिघांवर निलंबनाच्या कारवाईने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. उल्हास पाटील, वर्षा पाटील तसेच त्यांच्या कन्या केतकी पाटील तिघे कुटुंबीय हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.

  • 22 Jan 2024 04:15 PM (IST)

    राजन विचारे यांच्याकडून माजी खासदार सतीश प्रधान यांचा सत्कार

    प्रभू श्री रामांचे जन्मस्थान ओळखल्या जाणाऱ्या आयोध्या नगरीत श्री राम मंदिर उभे रहावे हे समस्त हिंदू बांधवांचे स्वप्न होते. आज खऱ्या अर्थाने तेथे राम मंदिर उभे राहत आहे. ज्यांनी या लढ्यासाठी मोलाच योगदान दिले ते त्यावेळचे उत्तरप्रदेश चे संपर्क प्रमुख व माजी खासदार सतीश प्रधान यांच्या राहत्या घरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना नेते, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केले.  यावेळी  इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

  • 22 Jan 2024 04:00 PM (IST)

    कांदिवलीत मनसे कार्यकर्त्यांकडून 500 किलो लाडूंचे वाटप

    अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त चारकोप विधानसभा मनसेच्या वतीने संपूर्ण कांदिवलीमध्ये ५०० किलो लाडूंचे वाटप करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनाही लाडू वाटप केले.इतकेच नाही तर मनसेकडून पोलीस ठाण्यात लाडू वाटण्यात आले.

  • 22 Jan 2024 04:00 PM (IST)

    आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल – केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी

    आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आम्ही केवळ 500 वर्षे जुन्या गोष्टी बोलत नाही, तर आम्ही एका भावनिक बंधाबद्दल बोलत आहोत. प्रभू राम यांना त्यांच्या जन्मस्थानी पोहोचायला 500 वर्षे लागली असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे.

  • 22 Jan 2024 03:54 PM (IST)

    सांगली परिसर राममय झाला..

    सांगलीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा जल्लोषी वातावरणात साजरा. चौकाचौकात जय श्रीराम आमच्या घोषणांनी सांगली नगरीचे वातावरण राममय. श्रीराम मंदिर चौकात भव्य सोहळ्यात हजारो सांगलीकरांनी घेतला सहभाग.

  • 22 Jan 2024 02:50 PM (IST)

    आता कालचक्र पुन्हा बदलणार- नरेंद्र मोदी

    आता कालचक्र पुन्हा बदलणार असल्याचे मोठे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • 22 Jan 2024 02:40 PM (IST)

    संपूर्ण देश दिपोत्सव साजरा करतोय- नरेंद्र मोदी

    संपूर्ण देश दिपोत्सव साजरा करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 22 Jan 2024 02:31 PM (IST)

    अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम आलेत- नरेंद्र मोदी

    अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम आलेत, असे मोठे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • 22 Jan 2024 02:27 PM (IST)

    प्रभू श्रीराम हे आज आपल्याला नक्कीच क्षमा करतील- नरेंद्र मोदी

    प्रभू श्रीराम हे आज आपल्याला नक्कीच क्षमा करतील, असे मोठे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • 22 Jan 2024 02:24 PM (IST)

    राम लल्ला आता तंबूत राहणार नाहीत- नरेंद्र मोदी

    राम लल्ला आता तंबूत राहणार नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 22 Jan 2024 02:15 PM (IST)

    आज आपले राम आलेत- नरेंद्र मोदी 

    आज आपले राम आलेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 22 Jan 2024 02:13 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपस्वी आहेत- मोहन भागवत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपस्वी आहेत, मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे.

  • 22 Jan 2024 02:05 PM (IST)

    एक नवीन भारत उभा राहिला- मोहन भागवत

    एक नवीन भारत उभा राहिला, असे मोहन भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे.

  • 22 Jan 2024 01:55 PM (IST)

    मंदिर बनवण्यासाठी अनेक स्थरावर संघर्ष करावा लागला- योगी आदित्यनाथ

    आपल्याच देशात एक मंदिर बनवण्यासाठी वेगवेगळ्या स्थरावर अनेकांना संघर्ष करावा लागला. आज कोट्यावधी भारतीयांच्या ह्वदयात असलेले राम अयोध्येत विराजमान झाले आहेत. असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

  • 22 Jan 2024 01:45 PM (IST)

    पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात संबोधीत करणार

    प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधीत करणार आहे. ते यावेळी देशवासीयांशी काय संवाद साधणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

  • 22 Jan 2024 01:18 PM (IST)

    पंतप्रधान मोदींचा रामललाला साष्टांग नमस्कार

    प्राणप्रतिष्ठापना विधीनंतर पंतप्रधान मोदी यांनी रामललाला साष्टांग नमस्कार केला. रामललासमोर मोदी नतमस्त झाले. मंदिरातील इतर पूजाऱ्यांचे देखील त्यांनी आशिवाद घेतले.

  • 22 Jan 2024 01:06 PM (IST)

    प्राण प्रतिष्ठा विधी पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामललाची आरती

    रामललाचा प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामललाची आरती पूर्ण झाली.

  • 22 Jan 2024 12:51 PM (IST)

    भव्य राममंदिरात रामलल्ला विराजमान

    राम मंदिरात वैदिक मंत्रोच्चारानं रामल्लाची प्राणप्रतिष्ठा विधी सुरू आहे. भव्य मंदिरात रामल्ला विराजमान झाले आहे.

  • 22 Jan 2024 12:32 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरातील गर्भगृहात विधीवत पूजा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरातील गर्भगृहात विधीवत पूजा केली जात आहे. 12.29 च्या शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात आली.

  • 22 Jan 2024 12:20 PM (IST)

    अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली आहे.

  • 22 Jan 2024 12:08 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात पोहोचले

    राम मंदिरात पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी मंदिरात मोदी पोहोचले आहेत.

  • 22 Jan 2024 11:43 AM (IST)

    Live Update : देवेंद्र फडणवीस नागपुरातील राम मंदिरात

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील राम मंदिरात पोहोचले आहेत. राम नगर मधील राम मंदिरात देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केली आहे.

  • 22 Jan 2024 11:20 AM (IST)

    Live Update : आयोध्यात राम उत्सव, सांगलीमध्ये रामचंद्रांची रथातून मिरवणूक

    आयोध्यात राम उत्सव होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर येथे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रभू रामचंद्राची रथातून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी मिरवणुकीत ढोल वाजवत आनंद व्यक्त केला…

     

  • 22 Jan 2024 10:48 AM (IST)

    Ram Mandir | बॉलिवूड कलाकारांचेही अयोध्येत आगमन

    अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूड कलाकारांचेही अयोध्येत आगमन झाले. माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आयुष्मान खुराना, राजू हिरानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित.

     

  • 22 Jan 2024 10:43 AM (IST)

    Ram Mandir | पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात त्यांचं राममंदिर परिसरात आगमन होईल.

  • 22 Jan 2024 10:39 AM (IST)

    Ram Mandir | माझ्यासाठी आजचा दिवस, हा क्षण भावनिक – देवेंद्र फडणवीस

    नागपूर : माझ्यासाठी आजचा दिवस, हा क्षण भावनिक आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 22 Jan 2024 10:35 AM (IST)

    Ram Mandir | अनेक व्हीआयपीचे आगमन, बॉलिवूड कलाकारही सोहळ्यासाठी दाखल

    अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अभूतपूर्व उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक व्हीआयपींचे आगमन झाले आहे. महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अरूण गोविल, अनिल अंबानी, जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे मंदिर परिसरात आगमन झाले आहे.

  • 22 Jan 2024 10:22 AM (IST)

    Ram Mandir | सरसंघचालक मोहन भागवत मंदिर परिसरात पोहोचले

    सरसंघचालक मोहन भागवत मंदिर परिसरात पोहोचले. उपस्थित असलेल्या साधू-महंतांना केले अभिवादन, साधला संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित असतील.

     

  • 22 Jan 2024 10:12 AM (IST)

    Ram Mandir | राजधानी दिल्लीतील मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी

    राजधानी नवी दिल्लीतील मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी.  दिल्लीतल्या सर्व मंदिरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

    विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करून मंदिर सजली आहेत.

  • 22 Jan 2024 10:06 AM (IST)

    Ram mandir | राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिरात पोहोचले. आरतीवेळी राम मंदिरावर आणि अयोध्या शहरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार. निमंत्रित पाहुणे आरतीवेळी घंटानाद करणार.

     

  • 22 Jan 2024 09:57 AM (IST)

    गोंदियात रांगोळी काढत सजावट

    गोंदियात पहाटे 3 वाजेपासून महिलांनी रांगोळी टाकत राम उत्सव साजरा करत आहेत. गोंदिया शहरातील रेलटोली परिसरात महिलांनी रांगोळी काढली आहे. ज्या परिसरातून रामाची रॅली जाणार आहे. त्या त्या ठिकाणी काढण्यात रांगोळी आली आहे.

  • 22 Jan 2024 09:45 AM (IST)

    सांगलीतही उत्साहाचं वातावरण

    अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अभूतपूर्व उद्घाटन सोहळ्यानिमित्त सांगलीतील कै. श्री गणपतराव जोशी स्मृती प्रित्यर्थ जोशी परिवारातर्फे आज श्रीराम पहाट कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमास रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सुरेल मैफिलित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी आपल्या सुरेल गायनाने सर्वांना रामभक्तिमध्ये लिन केले.

  • 22 Jan 2024 09:30 AM (IST)

    अंबाबाई मंदिर परिसरातील राम मंदिरात छत्रपती कुटुंबाकडून अभिषेक

    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील राम मंदिरात छत्रपती कुटुंबाकडून अभिषेक आणि धार्मिक विधी केले जाणार आहेत. संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते धार्मिक विधी होणार आहेत.  श्रीमंत शाहू छत्रपती देखील थोड्याच वेळात दाखल होणार आहेत.

  • 22 Jan 2024 09:15 AM (IST)

    नागपूरच्या जगदंबा महालक्ष्मी मंदिरात 6000 किलोंच्या हलव्याचा प्रसाद

    नागपूरमधल्या कोराडीच्या जगदंबा महालक्ष्मी मंदिरात श्रीराम उत्सवाच्या निमित्ताने 6000 किलो हलवा बनविला जात आहे.  हलवा बनवायला सुरवात झाली आहे. प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर 2000 किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये हा हलवा बनवत आहेत.  श्रीरामाचा प्रसाद म्हणून हलव्याचे भक्तांना वाटप होणार आहे. कोराडी मंदिर परिसर पूर्णतः सजविण्यात आला असून राममय वातावरण झालंय.

  • 22 Jan 2024 08:59 AM (IST)

    Ram mandir | पुण्यात हजारोंनी डिजेच्या तालावर धरला ठेका

    डिजेच्या तालावर महिला-पुरुष हजारोंच्या संख्येने पुण्याच्या रस्त्यावर आनंद साजरा करत आहेत. विविध वेशभूषा करत राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची मिरवणूक काढण्यात आलीय. या रॅलीत काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर सहभागी .

  • 22 Jan 2024 08:46 AM (IST)

    Ram Mandir | ‘भगवान हनुमानाने व्यक्तीगत निमंत्रण दिलय असं मला वाटतय’

    ‘भगवान हनुमानाने व्यक्तीगत निमंत्रण दिलय असं मला वाटतय’, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी निघताना अभिनेते चिरंजीवी यांचे उद्गगार

  • 22 Jan 2024 08:21 AM (IST)

    Ram Mandir | अनुपम खेर काय म्हणाले?

    प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात जाण्याआधी भगवान हनुमानाच दर्शन घेणं महत्त्वाच आहे. अयोध्येतील वातावरण खूप सुंदर आहे. इथल्या हवेत सर्वत्र जय श्री रामची घोषणा आहे. पुन्हा एकदा दिवाळी आलीय, ही खरी दिवाळी आहे असं अभिनेते अनुपम खेर म्हणाले.

  • 22 Jan 2024 08:06 AM (IST)

    Pune news | पुण्यात पहाटेपासून राम मंदिरात दर्शनासाठी रांग

    ज्यांना आज आयोध्येत जाणं शक्य नाही ते आपापल्या घराजवळच्या राम मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी येत आहेत. महिला टाळ वाजवत भजनात तल्लीन झाल्या आहेत. पुण्यातील तुळशी बागेतील प्राचीन राम मंदिरात महिलामंडळाचे पहाटेपासून भजन सुरु आहे. अयोध्येतल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पेशव्यांचे नगररचनाकार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी 1778 साली उभारलेलं हे पेशवेकालीन राममंदिर आहे

  • 22 Jan 2024 07:55 AM (IST)

    Ram Mandir | दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विद्युत रोषणाई

    अयोध्येतील रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. याच सोबत मंदिराच्या समोरच्या भिंतीवर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. यामध्ये राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मुर्ती साकारण्यात आल्यात. दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविक जमायला सुरुवात झाली आहे

  • 22 Jan 2024 07:47 AM (IST)

    Ram Mandir : राम मंदिराची मूर्ती कोणी बनवली

    राम मंदिरासाठी एकाच वेळी तीन मूर्ती बनवण्याचे काम सुरु होते. कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

    हे वाचा…
    रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत

  • 22 Jan 2024 07:29 AM (IST)

    Ram Mandir : राम मंदिराचे विदेशात कार्यक्रम

    अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाचे कार्यक्रम विदेशात होणार आहे. जगभरातील ५५ देशांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    ही वाचा…
    Ram mandir : अयोध्या राम मंदिर सोहळ्याची अमेरिकेतही धूम, पाच किलोमीटर लांब शोभायात्रा

  • 22 Jan 2024 07:16 AM (IST)

    Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा किती वाजता?

    अयोध्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त असणार आहे. सकाळी 12:29 ते 12:30 दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती होणार आहे.

    हे ही वाचा
    अयोध्येत 22 जानेवारी रोजी कसा असणार A to Z कार्यक्रम, पाच तास चालणार पूजाविधी

  • 22 Jan 2024 07:01 AM (IST)

    Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कोण करणार?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. यावेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास आणि सर्व ट्रस्टी गर्भगृहात उपस्थित असतील.

    हे ही वाचा
    अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण

  • 21 Jan 2024 04:08 PM (IST)

    समान नागरी कायद्याला लिंगायत समाजाचा पाठिंबा

    सांगली | समान नागरी कायद्याला लिंगायत समाजाचा पाठिंबा आहे. प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापना दिवस दिवाळी म्हणून साजरी करा. लिंगायत समाजाचा धर्म हिंदूच आहे. त्यामुळे स्वतंत्र धर्माची गरज नाही, असं मत जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीं वाराणसी यांनी व्यक्त केलं आहे.

  • 21 Jan 2024 03:55 PM (IST)

    मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर भाजपचे उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे यांचा उपक्रम

    जळगाव | प्रभू रामचंद्र यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात तब्बल 15 हजार स्केअर फुटची भव्य अशी रांगोळी साकारण्यात येत आहे. मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर भाजपचे उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे यांनी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कला छंद आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल 10 ते 12 विद्यार्थी ही भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीसाठी तब्बल डीच हजार किलो रांगोळीचा वापर अजून करण्यात आला आहे.

  • 21 Jan 2024 03:12 PM (IST)

    अनेक मंदिरांमध्ये उद्याच्या सोहळ्यासाठी जय्यत तयारी

    पुणे | प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील उत्सवासाठी राज्यातील मंदिर सजली आहेत. अनेक मंदिरांमध्ये उद्याच्या सोहळ्यासाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील उद्याच्या सोहळ्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सुंदर फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

    मंदिराच्या बाहेर फुलांनी प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं फुलांनी सजवलेलं सुंदर चित्र आहे. तसेच मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा सजावट करण्यात आली आहे. भाविकांची देखील दर्शनाला मोठी गर्दी आहे.

  • 21 Jan 2024 02:55 PM (IST)

    यवतमाळ जिल्हा बँकेच्या सीईओ नियुक्ती प्रकरणी संचालक मंडळास नोटीस

    यवतमाळ जिल्हा बँकेच्या सीईओ नियुक्ती प्रकरणी संचालक मंडळास नोटीस बजावली आहे. ए डी देशपांडे या सेवानिवृत्त व्यक्तीची बँकेच्या सीईओ पदी नियुक्ती केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. 31 जानेवारी ला उपनिबंधक कडे सुनावणी होणार आहे.

  • 21 Jan 2024 02:45 PM (IST)

    मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कार सेवेला जाणार- फडणवीस

    संपूर्ण देश हा राममय आहे. मी राम भक्त आहे. मी कार सेवक आहे मी सुद्धा राममय आहे. मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कार सेवेला जाणार आहे. कार सेवा झालेली आहे. आता राम सेवेला फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे सगळेच जाणार आहेत.

  • 21 Jan 2024 02:38 PM (IST)

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील उद्याच्या सोहळ्यासाठी मोठी तयारी

    प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील उत्सवासाठी राज्यातील मंदिर सजली आहे. अनेक मंदिरांमध्ये उद्याच्या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील उद्याच्या सोहळ्यासाठी मोठी तयारी केली आहे.  मंदिराच्या बाहेर फुलांनी प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं फुलांनी सजवलेलं सुंदर चित्र मंदिर आहे.

  • 21 Jan 2024 02:15 PM (IST)

    मुंबईतील जुहू बीचवर प्रभू श्रीरामाची 20 फूट उंचीची मूर्ती

    मुंबईतील जुहू बीचवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रभू श्रीरामाची २० फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. मनसेतर्फे आज रात्री येथे आरती व पूजा करण्यात येणार आहे. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा साजरा करत आहेत. राज साहेबांच्या हृदयात राम आहे, आज कारसेवकांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

  • 21 Jan 2024 02:05 PM (IST)

    सांगलीत मराठा क्रांती मोर्चा तर्फे सायकल रॅली

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. याच मागणीसाठी मुंबई येथे जरांगे पाटील धडकणार आहेत. याच आंदोलन ला पाठिंबा देण्यासाठी आज सांगलीत मराठा क्रांती मोर्चा तर्फे सायकल रॅली काढण्यात आली. तसेच 24 तारखेला मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला रवाना होणार आहे.

  • 21 Jan 2024 01:49 PM (IST)

    हिमाचल प्रदेश सरकारचीही उद्या सार्वजनिक सुटी जाहीर

    हिमाचल प्रदेश सरकारने अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

  • 21 Jan 2024 01:46 PM (IST)

    डोंबिवलीत श्री राम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त युवासेनेची बाईक रॅली

    अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने डोंबिवलीत युवा सेनेच्यावतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली. शेकडोच्या संख्येने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

  • 21 Jan 2024 01:34 PM (IST)

    अयोध्या: एक जुने स्वप्न पूर्ण होत आहे, आनंदाचा क्षण – जगद्गुरू रामभद्राचार्य

    एक खूप जुने स्वप्न पूर्ण होत आहे… हा एक मोठा विजय आहे… मी हा जीवनातील सर्वात गोड क्षण मानतो असे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

  • 21 Jan 2024 01:03 PM (IST)

    राम मंदिरात साफसफाईचा मान हा एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळाला 

    अयोध्यात प्रभू श्रीराम यांची उद्या प्राण प्रतिष्ठा होतेय तर दुसरीकडे मुंबईतही शिवसैनिकांचा एकच जल्लोष बघायला मिळतोय. अंधेरी वर्सोवा इथे १०० वर्ष जून्या राम मंदिरात साफसफाईचा मान हा एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळालाय.

  • 21 Jan 2024 12:45 PM (IST)

    मुंबईतील ओशिवरा येथे भाजपच्या वतीने श्री राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे

    येथे ही ५० फूट उंची भव्य राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. जे अयोध्येला जाऊ शकत नाहीत ते येथे येऊन राम मंदिराचे दर्शन घेऊ शकतात. या मंदिराचे स्वरूप अयोध्येच्या राम मंदिरासारखे करण्यात आले आहे.

  • 21 Jan 2024 12:19 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली चेंबूर येथील शनिश्वर मंदिरात स्वच्छता

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर पादरपोळ परिसरात स्वच्छता अभियानासाठी उपस्थित आहेत. परिसरातील शनिश्वर मंदिरात शनिदेवाची पूजा करून गाभाऱ्यात स्वच्छता करण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केलीये.

     

  • 21 Jan 2024 12:02 PM (IST)

    संपूर्ण भारत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करत आहे

    हिंदू असो की मुस्लिम, प्रत्येकजण या प्राण प्रतिष्ठेमुळे आनंदी आहे आणि प्रत्येकजण आपापल्या शैलीत सण साजरा करत आहे. गोरेगावच्या श्री राम मंदिरात मुस्लिम बांधव आनंदात साजरा करत आहेत. 22 तारखेलाही दिवाळी साजरी करणार असल्याचे मुस्लिम बांधवांनी सांगितले.

     

  • 21 Jan 2024 11:58 AM (IST)

    Ram Mandir : उद्घाटन सोहळ्यासाठी अयोध्येत फुलांची सजावट

    राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. संपूर्ण शहरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

  • 21 Jan 2024 11:38 AM (IST)

    Ram Mandir : उद्घाटन सोहळ्यासाठी साडेसहा हजार व्हिआयपी अयोध्येत येणार

    राम मंदिर उद्घाटनासाठी अयोध्येत अनेकांना निमंत्रण पाठवण्यात आले. उद्या या सोहळ्यासाठी साडेसहा हजार व्हिआयपी अयोध्येत येणार असल्याचा अंदाज आहे.

  • 21 Jan 2024 11:05 AM (IST)

    Ram Mandir : उद्या देशभरात दिवाळी साजरी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

    उद्या अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या निमित्त उद्या देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केली आहे.

  • 21 Jan 2024 10:59 AM (IST)

    Live Update : देवेंद्रजींनी श्रीरामांवर गाणं लिहिलंय अन् मी गायलंय, नवं गाणं रिलीज होणार- अमृता फडणवीस

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांबाबत एक गाणं लिहिलं आहे, ते लवकरच सर्वांच्या भेटीला येईल, असं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सांगितलं आहे. अमृता या स्वत: गायिका आहेत. त्यांनी देखील या गाण्याचं गायन केलं आहे. हे गाणं लवकरच रिलिज होणार आहे.

  • 21 Jan 2024 10:37 AM (IST)

    Live Update : मालाडमध्ये भव्य श्रीरामाची कलश यात्रा काढण्यात आली

    मालाडमध्ये भव्य श्रीरामाची कलश यात्रा काढण्यात आली आहे. मालाडमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य कलश यात्रेला सुरुवात झाली. या भव्य कलश यात्रेत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टीही उपस्थित आहेत.

  • 21 Jan 2024 10:22 AM (IST)

    Live Update : प्रभू श्रीराम दर्शनासाठी संपूर्ण आयोध्येत जोरदार तयारी सुरू

    प्रभू श्रीराम दर्शनासाठी संपूर्ण आयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे… उत्तर प्रदेशातही प्रत्येक विमानतळावर दिवाळी साजरी केली जातेय… रोषणाई, बॅनर्स आणि पोस्टर्सने संपूर्ण परिसर बहरून गेलंय…. लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेड कार्पेट टाकण्यात आलं आहे. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे…

  • 21 Jan 2024 09:57 AM (IST)

    10 लाख दिव्यांची आरस

    अयोध्येत 22 जानेवारी रोजी जणू दिवाळी साजरी होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अयोध्या नगरी दीपमाळेने उजळून निघेल. अयोध्येत 10 लाख दिव्यांची आरस होणार आहे. संध्याकाळी रामनगरीत दहा लाख दिवे लावण्यात येणार आहे.

  • 21 Jan 2024 09:42 AM (IST)

    दान दिल्यास कराचा लाभ

    अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, राम मंदिराच्या उभारणीचे काम करत आहे. हा ट्रस्ट केंद्र सरकारने तयार केला आहे. राम मंदिरात दान करण्यासाठी ही अधिकृत संस्था आहे. भाविक भक्त ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने दान करु शकता. युपीआय, क्यूआर कोड, एनईएफटी, आयएमपीएस, डिमांड ड्राफ, धनादेश याद्वारे भक्तांना दान करता येईल. विशेष म्हणजे एका ठराविक रक्कमेवर आयकर अधिनियमातंर्गत त्यांना कर सवलतीचा लाभ घेता येईल.

  • 21 Jan 2024 09:30 AM (IST)

    प्रभू श्रीरामांवर फडणवीस यांचे गीत

    प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार, सुखाची बाब आहे भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणार, योग्य निर्णय घेतल्यामुळे होत असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गाणे लिहिले आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे आणि त्यात मी देखील गायले आहे. आज पहिल्यांदाच मी हे सांगत आहे. हे गाणं लवकरच रिलीज होईल, असे त्या म्हणाल्या.

  • 21 Jan 2024 09:20 AM (IST)

    अयोध्येत २० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी

    अयोध्येत सुरक्षा आणि पोलिस तैनात करण्यात आले आहे. रामनगरीत २० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना चोख बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये विशेष सुरक्षा दल, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल, कमांडो, उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक, उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा पथक आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी उपस्थित आहेत.

  • 21 Jan 2024 09:10 AM (IST)

    अयोध्यावासीयांना जवळ बाळगावे लागणार ओळखपत्र

    आजपासून पुढील तीन दिवस अयोध्येत बाहेरील नागरिकांना अयोध्येत प्रवेश नाकारण्यात आला आहे. पण अयोध्यानगरीतील नागरिकांना शहरात दैनंदिन व्यवहार करता येतील. पण त्यासाठी त्यांना ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. अयोध्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

  • 21 Jan 2024 09:00 AM (IST)

    अयोध्येत आता No Entry

    नागरिकांना आणि वाहनांना अयोध्येत आता प्रवेश नाही. अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. सुरक्षेसाठी २० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

  • 21 Jan 2024 08:57 AM (IST)

    धुळ्यात अयोध्याप्रमाणे साकारलं मंदिर

    धुळ्यात पांजरा नदीच्या पात्रात साकारल्या जाणाऱ्या अयोध्याप्रमाणे मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मंदिराची लांबी 110  फूट असून उंची 60 फूट आहे. तर रुंदी 70 फूट आहे या आकाराचं हे अयोध्याप्रमाणे हुबेहुब मंदिर. आहे. आतापासूनच भक्तांची मंदिर बघण्यासाठी मोठी गर्दी केलीय.

  • 21 Jan 2024 08:45 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची सार्वजनिक महाआरती

    ठाण्यातील ढोकाळी मैदानात 21 फुटी प्रभू श्रीरामांची सार्वजनिक महाआरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी 5 ते 7 हजार च्या संख्येने महिला उपस्थित राहून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी बालाजी महिला उद्योग सहकारी स्वस्थाच्या वतीने माजी नगरसेविका उषाताई भोईर, संजय भोईर यांच्या वतीने हळदी कुंकू देखील ठेवण्यात आले होते. या सोहळ्यात रामाचा गजर करत फटाक्यांची अतिषबाजी देखील करण्यात आली.

  • 21 Jan 2024 08:30 AM (IST)

    मिरा भाईंदरमध्ये हुबेहुब प्रभू श्रीरामाची मूर्ती

    मिरा भाईंदर शहरातील भाईंदर (पूर्व) येथील जैसल पार्क चौपाटी येथे अयोध्या धामसारखी श्री राम मंदिर परिसराची 80 फूट उंचीची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्ताने 22 जानेवारी 2024 रोजी ते 28 जानेवारी 2024 असे सलग 7 दिवस आपल्या सर्वांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे मीरा भाईंदर हे अयोध्या धाम बनणार आहे. या कार्यक्रमामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी एक दिवा सोबत घेऊन यावा आणि या भव्य दीपोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • 21 Jan 2024 08:15 AM (IST)

    जय श्रीरामच्या जय घोषाने गोंदिया शहर दुमदुमलं

    जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषाने गोंदिया शहर दुमदुमलं. श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा निमित्त गोंदियात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सगळ्यांनी आपल्या मोटरसायकलवर राम झेंडे लावले. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.  गोंदिया भंडाराचे खासदार सुनील मेंढे देखील यात सहभागी झाले होते.

  • 21 Jan 2024 07:57 AM (IST)

    Ayodhya Ram Temple Consecration | ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती

    ठाण्यातील ढोकाळी मैदानात 21 फुटी रामाची सार्वजनिक महाआरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या सोहळ्यात रामाचा गजर करत फटाक्यांची अतिषबाजी देखील करण्यात आली

  • 21 Jan 2024 07:47 AM (IST)

    Ayodhya Ram Temple Consecration | पुण्यात पोलिसांचा रुट मार्च

    राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी पुणे पोलिसांकडून रात्रभर गस्त घालण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा पुणे पोलीस आयुक्तांनी आढावा घेतला.

  • 21 Jan 2024 07:35 AM (IST)

    Ayodhya Ram Temple Consecration | नागपूर मेट्रोमध्ये ३० टक्के सूट

    राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उद्या नागपूर मेट्रोतर्फे तिकीट दरात ३० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून २२ तारखेला शासकिय सुट्टी घोषित केली आहे.

  • 21 Jan 2024 07:21 AM (IST)

    Ayodhya Ram Temple Consecration | लालबागचा राजा मंडळाला निमंत्रण

    अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण मुंबईतील ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मानद सचिव सुधीर साळवी यांची शनिवारी लालबाग येथील मंडळाच्या कार्यालयात भेट घेतली व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले.