Ayodhya : 2,500 वर्षांतून एकदा होणारा भूकंप ही सहन करु शकेल राम मंदिर

| Updated on: Feb 01, 2024 | 5:02 PM

अयोध्येत भव्य असे राम मंदिर बनवूव तयार झाले आहे. राम मंदिरात दररोज लाखो लोकं दर्शनासाठी येत आहेत. मंदिराचं आकर्षण वाढले आहे. त्यामुळे देशातूनच नव्हे तर परदेशातून ही लोकं अयोध्येत येत आहे. पण अयोध्येत बांधण्यात आलेले मंदिर इतकं खास आहे की त्याची विशेषता अनेकांना माहित नाही.

Ayodhya : 2,500 वर्षांतून एकदा होणारा भूकंप ही सहन करु शकेल राम मंदिर
Follow us on

Ayodhya Ram mandir : अयोध्या राम मंदिर सध्या देशातील लोकांसाठी आनंद देणारा क्षण ठरत आहे. कारण मोठ्या संख्येने दररोज येथे हजारो लोक दाखल होत आहेत. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून येथे आतापर्यंत लाखो लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. राम मंदिर बनवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. राम मंदिराचं बांधकाम करताना अनेक गोष्टींची काळजी घेतली गेली आहे. राम मंदिर ५०० वर्षानंतर बनवण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. पण तुम्हाला राम मंदिराबाबत एक गोष्ट माहित आहे की, हे मंदिर 2,500 वर्षांत एकदा येणा-या सर्वात मोठ्या भूकंपाचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

सर्वात तीव्र भूंकपातही मंदिर राहिल सुरक्षित

CSIR म्हणजेच सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी म्हटले की, राम मंदिर भूभौतिकीय वैशिष्ट्य, भू-तांत्रिक विश्लेषण, पाया डिझाइन तपासणी आणि 3D संरचनात्मक विश्लेषण आणि डिझाइन करुन बनवण्यात आले आहे.

CSIR-CBRI चे वरिष्ठ शास्त्रज्ञ देबदत्त घोष यांनी पीटीआयला माहिती दिली की, “2,500 वर्षांच्या परतीच्या कालावधीच्या समतुल्य, जास्तीत जास्त तीव्रतेच्या भूकंपातही मंदिराची संरचनात्मक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वैज्ञानिकदृष्टीने अभ्यास केला गेला आहे.” यासाठी अनेक वैज्ञानिकांची मदत घेतली गेली आहे.

CSIR-CBRI कडून माती देखील तपासली गेली. पाया घालताना त्याचे डिझाइन पॅरामीटर्स तपासले गेले. संरचना निरीक्षणासाठी शिफारसी देखील तपासल्या गेल्या. 50 पेक्षा जास्त संगणक मॉडेल्सचे अनुकरण केले गेले. सगळे कागी तपासल्यानंतर स्ट्रक्चरल डिझाइन केले गेले.

मंदिराचे आयुष्य एक हजार वर्षापेक्षा जास्त

हे संपूर्ण मंदिर बनवण्यासाठी बन्सी पहारपूर वाळूचा खडक वापरून तयार केले गेले आहे. ज्यामध्ये कोणतेही लोखंड किंवा स्टील वापरण्यात आलेले नाही. या मंदिराचे आयुष्य 1,000 वर्षांपेक्षा जास्त आहे.

मंदिरात सागाच्या लाकडांचा वापर

अयोध्येतील राम मंदिर बनवण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. मंदिराता बसवलेले दरवाजे देखील सागाच्या लाकडापासून बनवले गेले आहे. ज्यांचे आयुष्य एक हजार वर्षापेक्षा जास्त आहे.

मूर्ती बनवण्यासाठी ही विशेष दगडाचा वापर

मंदिरात बसवण्यात आलेली मूर्ती देखील विशेष खडकापासून बनवण्यात आली आहे. ज्याच्यावर कोणताच परिणाम होऊ शकत नाही. मूर्ती बनवण्यासाठी एकच अखंड दगड वापरण्यात आला आहे.