अयोध्या | दि. 1 मार्च 2024 : अयोध्यातील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन आता महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान झाले आहेत. त्यानंतर राम मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी रोज येत आहेत. देश-विदेशातून भाविक येत आहे. मंदिरात भाविकांना चमत्कार दिसत आहेत. मानवाबरोबर पक्षी आणि प्राणीही मंदिरात येत आहेत. काही दिवसांपूर्वी रामलल्लाच्या गर्भगृहाजवळ एक माकड आले होते. आता पक्षीराज गरुड मंदिरात आले आहे. गरुडाकडून मंदिरात परिक्रमा लावली गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु या प्रसंगी सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ उडला. कोणी या पक्षाच्या पायाला काहीतरी किंवा चीप तर पाठवली नाही, अशी शंका सुरक्षा यंत्रणेस आली. त्यामुळे गरुडराजाला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. अखेर स्वत:हून रात्री गरुड बाहेर निघून गेला.
व्हायरल व्हिडिओसंदर्भात राम मंदिरातील पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी म्हटले की, हा गरुड पक्षी होता. त्याने उत्तर दरवाज्यातून मंदिरात प्रवेश केला. गुढी मंडपात फेऱ्या मारल्यानंतर तो सरळ गर्भगृहात पोहचला. राम भक्तांनी त्यांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी सीआरपीएफ जवान अलर्ट झाले. त्यांनी त्या गरुडराजाला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु तो वरती जाऊन एका ठिकाणी बसला. परंतु त्यानंतर रात्रीच्या शयन आरतीनंतर मंदिराचे पट बंद होण्यापूर्वी तो स्वत:हून निघून गेला.
गरूर देव द्वारा प्रभु श्री रामलला की परिक्रमा का अद्भुत दृश्य 🙏🚩 pic.twitter.com/XguyqTAn4l
— Shri Ram Janmbhoomi Mandir 🛕⛳ (@ShriRamMandirA) February 27, 2024
अयोध्येत राम मंदिरात भाविकांची संख्या वाढत आहे. तसेच पशू आणि प्राणी येत आहे. 22 जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली होती. ती घटना पाहून मंदिरातील पुजारी आणि सुरक्षा अधिकारी आश्चर्यचकीत झाले होते. त्या दिवशी संध्याकाळच्या आरती पूर्वी एक माकड त्या ठिकाणी आले. तो एकटक प्रभू रामचंद्रांची मूर्ती पाहत राहिला. त्यानंतर थोड्यावेळाने निघून गेला. या घटनेची माहिती ट्रस्टकडून एक्सवर शेअर केली गेली होती.
हे ही वाचा
Ram Mandir | जेलमध्ये झाडू लावून मुस्लिम कैद्याने राम मंदिरास दान दिली पूर्ण कमाई