अयोध्या राम मंदिराचे काम मंद गतीने, निर्मितीची कामे रेंगाळण्याचे कारण आले समोर

| Updated on: Jul 31, 2024 | 8:45 AM

ayodhya ram mandir news: अयोध्येतील हवामानामुळे कामगारही येथून निघून गेल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, 'एल अँड टी कंपनीला मजुरांना परत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणे अशक्य नाही.

अयोध्या राम मंदिराचे काम मंद गतीने, निर्मितीची कामे रेंगाळण्याचे कारण आले समोर
ayodhya
Follow us on

अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा जानेवारी महिन्यात झाली. परंतु या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही. हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे राम मंदिर ट्रस्टकडून सांगितले जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मंदिराचे काम मंद गतीने सुरु आहे. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिराच्या निर्मिती कार्यात 8000- 9000 मजूर काम करत होते. त्यातील निम्यापेक्षा जास्त मजूर काम सोडून गेले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कामावर झाल्याचे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. लार्सन एंड टर्बो कंपनी राम मंदिर निर्मितीचे काम करत आहेत.

डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या कामासंदर्भात लार्सन एंड टर्बो कंपनीला काही महत्वाचे निर्देश दिले गेले आहेत. डिसेंबर 2024 पर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या वाढवण्याचे म्हटले गेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून मंदिराचे काम धीम्या गतीने होत आहे. कारण मंदिर निर्मितीसाठी असलेल्या मजुरांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मजुरांनी काम सोडले आहे.

कळस निर्मितीचे सर्वात मोठे आव्हान

राम मंदिराच्या विविध कामांसाठी 100 पेक्षा जास्त ठेकेदार आहेत. या ठेकेदारांनी मजुरांना कामावर ठेवले आहे. यामुळे नृपेंद्र मिश्रा यांनी या ठेकेदारांची बैठक घेतली. त्यात त्यांना मजूरांची समस्या दूर करण्याचे निर्देश दिले गेले. मंदिराच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठे आव्हान कळस निर्मितीचे आहे. दुसऱ्या मजल्याचे काम पूर्ण झाल्यावर कळस तयार करण्यात येणार आहे. सध्याची कामाची गती पहिल्यावर दोन महिने उशीर होऊ शकतो, असे नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

का सोडून गेले मजूर

अयोध्येतील हवामानामुळे कामगारही येथून निघून गेल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एल अँड टी कंपनीला मजुरांना परत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणे अशक्य नाही.