Ram Mandir | रामलल्ला यांचा संपूर्ण श्रृंगार परिधान केलेला EXCLUSIVE फोटो समोर

| Updated on: Jan 19, 2024 | 8:06 PM

रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा आधी श्रीरामांची मंदिराच्या गर्भगृहातील एक एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आला आहे. या नव्या फोटोत रामलल्ला यांच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांचा श्रृंगार परिधान करण्यात आलेला दिसतोय.

Ram Mandir | रामलल्ला यांचा संपूर्ण श्रृंगार परिधान केलेला EXCLUSIVE फोटो समोर
Follow us on

अयोध्या | 19 जानेवारी 2024 : अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे. या दिवशी लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. पण रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा आधी श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील एक एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आला आहे. या नव्या फोटोत रामलल्ला यांच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांचा श्रृंगार परिधान करण्यात आलेला दिसतोय. या फोटोत रामलल्लांच्या डोळ्यावर पट्टी दिसत आहे. पण त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने परिधान करण्यात आलेलं बघायला मिळत आहे. या फोटोच्या निमित्ताने रामभक्तांना रामलल्ला यांच्या अतिशय सुंदर मूर्तीचं दर्शन झालं आहे. या फोटोत रामलल्ला यांच्या हातात धुष्यबाणही दिसत आहे.

रामल्लांची मूर्ती नुकतीच मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली होती. त्यानंतर रामलल्ला यांच्या मूर्तीचा फोटो समोर आला होता. संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण त्या फोटोत रामलल्ला यांच्या मूर्तीवर दागिने परिधान करण्यात आले नव्हते. त्यानंतर आता रामलल्ला यांच्या मूर्तीला दागिने परिधान केलेला नवा फोटो समोर आला आहे. रामलल्ला यांच्या डोळ्यांना पिवळ्या पट्टीने (पितांबर) झाकलं आहे. या मूर्तीला सोन्याच्या अभूषणांचा श्रृंगार करण्यात आला आहे.

मैसूरचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी रामलल्लांची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती 51 इंचाची आहे. या मूर्तीला कालच (18 जानेवारी) सकाळी मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आलं होतं. कमळच्या फुलात विराजमान झाल्यानंतर या मूर्तीची उंची ही 8 फूट इतकी होते. या मूर्तीचं वजन 150 ते 200 किलोग्रामच्या आसपास आहे. रामलल्लांच्या या मूर्तीला काळ्या पाषाणातून साकारण्यात आलं आहे.

मंत्रोच्चारात रामलल्लांची मूर्ती गर्भगृहात विराजमान

रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभवणारे पुजारी अरुण दीक्षित यांनी रामलल्ला यांच्या मूर्तीबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. रामलल्ला यांच्या मूर्तीला गुरुवारी सकाळी गर्भगृहात विराजमान केलं गेलं होतं. यावेळी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि रामभक्त उपस्थित होते. मंत्रोच्चार करुन रामलल्ला यांना गर्भगृहात विराजमान करण्यात आलं होतं.