नवरात्र उत्सवात ठिकठिकाणी रामलीलाचे कार्यक्रम होत असतात. अयोध्येत होणारी देशात नाही तर विदेशातही रामलीला प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील रामभक्तांना ही रामगाथा आकर्षित करत असते. रामलीला दूरदर्शनसोबत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आली. त्याला दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर पडसाद मिळाला. तीन दिवसांत 41 कोटी लोकांनी ही रामलीला देश-विदेशात पाहिली. 40 देशांतील 26 भाषांमध्ये तिचे प्रसारण झाले आहे.
फिल्मी रामलीला समितीचे अध्यक्ष सुभाष मलिक यांनी सांगितले की, अयोध्येत फिल्मी कलाकारांची रामलीला 2020 मध्ये सुरु झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या रामलीलास प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी ऑनलाईन रामलीला पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी 40 कोटी लोकांनी रामलीला पाहिली. तो विक्रम यंदा मोडण्यात आला. यंदा 41 कोटी लोकांनी ही रामलीला देश-विदेशात पाहिली. दूरदर्शनवर या रामलीलास आतापर्यंत 22 कोटी तर यू ट्यूबवर 17 कोटी आणि इतर प्लॅटफॉर्मवर दोन कोटी लोकांनी रामलीला पाहिली.
रामलीलाचे निर्देशक शुभम मलिक यांनी सांगितले की, रामलीलाचे 26 भाषांमध्ये लाईव्ह प्रसारण होते. दूरदर्शन-यूट्यूबसह अन्य सोशल प्लेटफॉर्मवर रामलिला दाखवली जाते. रामभक्त घरीबसून भगवान रामची गाथा पाहतात. रामलीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलँड, त्रिनिडाड, श्रीलंका, मलेशिया, फिजी, रूस, दक्षिण कोरियासह जगातील 40 देशांमध्ये दाखवली जाते. हिंदी, मल्यालम, तेलुगु, तमिळ, बंगाली, पंजाबी, गुजराती या भाषांमध्ये रामलीलाचे प्रसारण होते. अयोध्येत राम मंदिर झाले आहे. त्यामुळे प्रेक्षक वाढले आहेत.
रामलीलामध्ये अभिनेता बिंदु दारा सिंह, मनीष पाल, अवतार गिल, रजा मुराद, राकेश बेदी, वेद सागर, अनिमेष मिढा़, विनय सिंह हे कलाकार वेगवेगळी भूमिका साकारत आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री, शीबा, ऋतु शिवपुरी, अमिता नागिया, मैडोना, पायल गोगा कपूर यांच्याही भूमिका आहेत. पद्मश्री मालिनी अवस्थी शबरीच्या भूमिकेत आहे.