अयोध्या | 10 डिसेंबर 2023 : अयोध्येतील प्रभू श्रीरामचे मंदिर नवीन वर्षांत भाविकांसाठी खुले होणार आहे. अयोध्या (Ayodhya) येथील श्री राम मंदिर (Ram Mandir) च्या प्राण प्रतिष्ठापणेसाठी काही दिवसच राहिले आहे. यामुळे अयोध्येत जोरात तयारी सुरु आहे. अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी या गर्भगृहाचे फोटो शेअर केले आहेत. गर्भगृह परिसरातील लाइटिंग आणि फिटींगचे काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर रामायणकालीन प्रमुख प्रसंगांचे मनमोहक चित्रण करण्यात आले आहे. गर्भगृहात प्रभू रामाची एक मूर्ती विराजमान होणार आहे. परंतु एकाच तीन मूर्त्या तयार केल्या जात आहेत. त्यातील एक मूर्तीच बसवण्यात येणार आहे.
राम मंदिरात अचल मूर्तीचे निर्माणकार्य रामसेवक पुरम येथील कार्यशाळेत होत आहे. कर्नाटकातून आलेल्या श्याम शिळेतून दोन मूर्ती तर एक राजस्थानमधून आलेल्या संगमरवर दगडातून एक मूर्ती केली जात आहे. या तिन्ही मूर्तीं जवळपास तयार झाल्या आहेत. आता आयआयटी हैदराबादमधील तज्ज्ञ मूर्तींच्या दगडांच्या गुणवत्तेचा अहवाल देणार आहे. त्यावरुन एका मूर्तीची निवड करण्यात येणार आहे. तिन्ही मूर्तींपैकी कोणत्या मूर्तीचे आयुष्य सर्वाधिक आहे, दगडाची चमक किती वर्ष राहणार, हे अहवालात असणार आहे.
राम मंदिरातील मूर्तींची निवड याच महिन्यात करण्यात येणार आहे. काशीचे शंकराचार्य विजयेंद्र स्वरस्वती, काशीचे प्रसिद्ध विद्वान गणेश्वर द्रविड व दक्षिण भारतातील प्रमुख संताची मान्यता मूर्तीसाठी घेतली जाणार आहे. मूर्तीवर प्रकाश पडल्यावर कोणती मूर्ती जास्त भव्य दिसणार आहे, हे पाहिले जाणार आहे.
प्रभु श्री रामलला का गर्भ गृह स्थान लगभग तैयार है। हाल ही में लाइटिंग-फिटिंग का कार्य भी पूर्ण कर लिया गया है। आपके साथ कुछ छायाचित्र साझा कर रहा हूँ। pic.twitter.com/yX56Z2uCyx
— Champat Rai (@ChampatRaiVHP) December 9, 2023
अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यात एक चल मूर्ती तर दुसरी अचल मूर्ती असणार आहे. सध्या पुजेत असणाऱ्या रामलल्लाच्या रुपातील मूर्तीला उत्सव म्हणजेच चल मूर्तीच्या रुपात प्रतिष्टित केले जाणार आहे. तर नवीन मूर्ती अचल मूर्तीच्या रुपात असणार आहे.