कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल; गायब झालेल्या बागेश्वर बाबांचा व्हिडीओतून कुणावर निशाणा?

| Updated on: Jan 28, 2023 | 8:36 AM

बागेश्वर बाबांचा हा इशारा मुस्लिम धर्मगुरुंच्या विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जात आहे. त्यावरून त्यांनी हा इशारा दिल्याचं सांगितलं जातं.

कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल; गायब झालेल्या बागेश्वर बाबांचा व्हिडीओतून कुणावर निशाणा?
bageshwar dham
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

डेहराडून: अचानक चर्चेत आलेल्या बागेश्वर बाबांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. उत्तराखंडच्या दौऱ्यावर आलेल्या बागेश्वर बाबांनी एक मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यातून त्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. या व्हिडीओतून त्यांनी आपल्या देवभूमीतील दोन ते तीन दिवसाच्या दौऱ्याची माहिती दिली आहे. बागेश्वर बाबा अचानक गायब झाल्याची बातमी आली होती. यापार्श्वभूमीवर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बागेश्वर बाबा अचानक गायब झाले होते. त्यांचा मोबाईलही लागत नव्हता. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, नव्या व्हिडीओ जारी करून त्यांनी देवभूमीत आल्याचं सांगतानाच बागेश्वर धाममध्ये यज्ञ होणार आहे. त्यासाठी तप करणाऱ्या साधू संतांना निमंत्रण देण्यासाठी इथे आल्याचं त्यांनी सांगितलं.

बागेश्वर बाबांनी या एका मिनिटाच्या व्हिडीओतून विरोधकांवर निशाणा साधला आहे. कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बाबांच्या या इशाऱ्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मी लवकरच बागेश्वर धाममध्ये असणार आहे, हे मी सर्व वेड्यांना सांगतो. मी बागेश्वर धामला लवकरच जाणार आहे, असं बागेश्वर बाबा या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

सनातन धर्माचा झेंडा फडकवत ठेवा

देवभूमी, पवित्र हिमालयाची भूमी आहे. मोठमोठ्या ऋषी, मुनी आणि संतांच्या साधनेची उत्तराखंड ही भूमी आहे. तपस्वी, योगी, अमलात्मा, विमलात्मा आणि साधूंचे स्थान आणि पदचिन्ह या ठिकाणी आहेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व संताना आमंत्रित करत आहोत. त्यानंतर लवकच बागेश्वर धामला जाऊ. तुम्ही सर्व वाट पाहा. सनातन धर्माचा झेंडा असाच फडकवत ठेवा. कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुस्लिमांना इशारा?

बागेश्वर बाबांचा हा इशारा मुस्लिम धर्मगुरुंच्या विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जात आहे. त्यावरून त्यांनी हा इशारा दिल्याचं सांगितलं जातं. याआधीही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत घर वापसी करत राहणार असल्याचा इशारा दिला होता. तसेच धर्मांतर घडवून आणणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ जारी करून सूचक इशारा दिला आहे.

जोशी मठाचा उल्लेख नाही

दरम्यान, उत्तराखंडातच जोशीमठ आहे. जोशीमठाच्या परिसरात भुस्खलन होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना घर सोडून इतरत्र जावं लागलं आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी या संदर्भात चमत्कार करण्याचं आव्हान बागेश्वर बाबांना दिलं होतं. त्यामुळे त्यावर बागेश्वर बाबा काही बोलतील अशी चर्चा होती. मात्र, या व्हिडीओत जोशी मठाचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही.