माझ्या पत्नीचे 8 पती, महिलेने म्हटले, जज साहेब, आठ नाही चार… दोघांचा संवाद ऐकल्यावर न्यायालयात…

| Updated on: Sep 13, 2024 | 4:10 PM

Marriage case in high court: पतीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा विचार करत असल्याचे त्या महिलेने कोर्टात म्हटले. पतीने आठ लग्न झाल्याचा चुकीचा आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना पतीचे वकील म्हणाले, आमच्याकडे आठ लोकांसोबत तिने लग्न केल्याचे कागदपत्रे आहेत.

माझ्या पत्नीचे 8 पती, महिलेने म्हटले, जज साहेब, आठ नाही चार... दोघांचा संवाद ऐकल्यावर न्यायालयात...
Marriage
Follow us on

न्यायालयात विविध प्रकारचे खटले दाखल होत असतात. त्या खटल्यांमध्ये काही खटले न्यालायलातच नव्हे तर न्यायालयाबाहेरही रंजक ठरतात. कर्नाटकातील बंगळुरु उच्च न्यायालयात असाच एक प्रकार घडला. न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठासमोर खटला सुरु होता. त्यावेळी पतीने पत्नीवर आरोप केला. तिचे आठ पती आहेत… मग महिलेने जे उत्तर दिले त्यानंतर न्यायालयही आवाक झाले. ती म्हणाली, आठ नाही, चारच पती आहेत.

बंगळुरुमधील एका पती-पत्नीमधील प्रकरण ऐकून न्यायालय हैरान झाले. पतीने पत्नीवर आरोप केला की, तिचे आठ पती आहेत. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्यावेळी त्या महिलेने सासूकडून छळ झाल्याचा आरोप केला. या सुनावणी दरम्यान महिलेचे सर्व पती न्यायालयात हजर होते. परंतु वेळेमुळे सर्वांची साक्ष होऊ शकली नाही.

तीन पतींनी दिले लग्नाचे प्रमाणपत्र

पतीचे वकील राजा हुसैन यांनी न्यायालयात सांगितले की, तीन पतींनी न्यायालयात लग्नाचे प्रमाणपत्र दिले आहेत. तसेच त्या महिलेविरुद्ध चौकशी सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यावेळी पत्नीचा वकिलाने आठ पती असल्याचा आरोप खोडून काढला. त्यानंतर वकील म्हणाला, आठ नाही तर चारच पती आहेत. त्या महिलेने चारही पुरुषांसोबत लग्न केले आहे.

हे सुद्धा वाचा

27 सप्टेंबरपर्यंत सुनावणी स्थगित

पतीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा विचार करत असल्याचे त्या महिलेने कोर्टात म्हटले. पतीने आठ लग्न झाल्याचा चुकीचा आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना पतीचे वकील म्हणाले, आमच्याकडे आठ लोकांसोबत तिने लग्न केल्याचे कागदपत्रे आहेत. मागील सुनावणीच्या वेळीस त्यातील पाच पती उपस्थित होते. आता अजून तीन पतींचे प्रमाणपत्र जमा केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने 27 सप्टेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. तसेच पतीच्या वकिलांना सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.