मॉडेलच्या मागे मागे फ्लॅटमध्ये आला होता खासदार, तेथेच हत्या करुन केले मृतदेहाचे तुकडे

| Updated on: May 24, 2024 | 4:37 PM

कोलकातामध्ये एका खासदाराच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. बांगलादेशमधील खासदार अन्वारुल अझीम यांच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. या हत्येमागे त्यांचाच मित्र असल्याचं समोर आले आहे. खासदाराला हनी ट्रॅपचा बळी बनवण्यात आले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.

मॉडेलच्या मागे मागे फ्लॅटमध्ये आला होता खासदार, तेथेच हत्या करुन केले मृतदेहाचे तुकडे
Follow us on

कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये बांगलादेशच्या खासदाराची निर्घृण हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अन्वारुल अझीम असे मृत बांगलादेशच्या खासदाराचे नाव आहे. कोलकात्यातील न्यू टाऊन भागातील एका उच्चभ्रू इमारतीमध्ये या खासदाराची हत्या झाली. आता या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. हा खासदार हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम यांना एका मॉडेलचा वापर करून हनी ट्रॅपमध्ये फसवण्यात आले आणि मग त्यांची हत्या झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशचे खासदार अन्वारुल अजीम हे कोलकात्याच्या न्यू टाऊनमधील एका फ्लॅटमध्ये हनी ट्रॅपच्या मदतीने येऊन फसले. बांगलादेशी मॉडेल सिलास्ती रहमानने त्यांना त्या फ्लॅटमध्ये बोलवले. तिथेच त्यांची हत्या करण्यात आली असा संशय आहे. ही महिला बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी आहे. हत्येनंतर मॉडेल मुख्य आरोपी अमानुल्ला अमान सोबत बांगलादेशला परतली. बांगलादेश पोलिसांनी या मॉडेलला अटक केल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार अन्वारुल अझीम हे १२ मे रोजी उपचारासाठी भारतात आले होते. पण दोन दिवसानंतर त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. बांगलादेश सरकारनेही आपल्या खासदाराचा शोध घेण्यासाठी भारत सरकारकडे मदत मागितली. त्यानंतर 19 मे रोजी मुझफ्फरपूरनंतर त्यांचा फोन बंद झाल्याचं समोर आलं. सीआयडी आणि एसटीएफने या हत्येतील एका संशयिताला अटक केली आहे. चौकशीत अटक आरोपी जिहाद हौलदार याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अख्तरझ्झमनच्या सांगण्यावरून त्याने आणि इतर चार बांगलादेशी नागरिकांनी खासदाराची फ्लॅटमध्ये गळा दाबून हत्या केल्याचं समोर आले आहे. खून केल्यानंतर त्यांनी खासदाराच्या मृतदेहाची तुकडे केले त्यानंतर एका सुटकेसमध्ये भरुन त्याची विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे.

बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी कोलकाता सीआयडीने नवा खुलासा केलाय. सीआयडीने सांगितले की, बांगलादेशी खासदाराची हत्या करण्यासाठी त्याच्या अमेरिकन मित्रानेच सुपारी दिली होती. पाच कोटी रुपयांची ही सुपारी देण्यात आली होती.