Bank Holidays in October : ऑक्टोबरमध्ये तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे अधिसूची जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जर काही बँकेत काही महत्त्वाचे काम असेल यादी आधीच पाहून घ्या. ऑक्टोबर महिन्यात अनेक सुट्ट्या येणार असल्याने तुम्हाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत हे जाणून घ्या. कारण ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, दुर्गा पूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
2 ऑक्टोबर 2023 (सोमवार)- गांधी जयंती- राष्ट्रीय सुट्टी
14 ऑक्टोबर 2023 (शनिवार)- महालय- कोलकातामध्ये बँका बंद राहणार
18 ऑक्टोबर 2023 : (बुधवार)- काटी बिहू- आसाममध्ये बँका बंद राहणार
21 ऑक्टोबर 2023 : (शनिवार) – दुर्गा पूजा (महासप्तमी)- त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद राहणार.
23 ऑक्टोबर 2023 : (सोमवार)- दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजया दशमी- त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तमिळनाडू, आसाम,आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, झारखंड, बिहारमध्ये बँका बंद राहणार
24 ऑक्टोबर 2023 :(मंगळवार)- दसरा/दसरा (विजया दशमी)/दुर्गा पूजा- आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहणार.
25 ऑक्टोबर 2023 : (बुधवार)- दुर्गा पूजा (दसैन)- सिक्कीममध्ये बँका बंद राहणार
26 ऑक्टोबर 2023 : (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन)/अधिग्रहण दिवस- सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहणार
27 ऑक्टोबर 2023 : (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन)- सिक्कीममध्ये बँका बंद राहणार
28 ऑक्टोबर 2023 : (शनिवार)- लक्ष्मीपूजन- बंगालमध्ये बँका बंद राहणार
31 ऑक्टोबर 2023 : (मंगळवार)- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती- गुजरातमध्ये बँका बंद राहणार