कानपूर : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत बॉल गेला म्हणून क्रिकेट ग्राउंडवर (Cricket Ground) जोरदार मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना नौबस्त पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बालाजी पार्कमधील आहे. संघाच्या शाखेत क्रिकेट खेळताना बॉल गेल्याने आरएसएस कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. पुढे या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. दोनही गट आपसात भिडले. या घटनेत सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर झाला आहे. दोनही गटांकडून लाठ्या -काठ्याने एकोंएकांना मारहाण करण्यात आली. यानंतर एका गटाकडून नौबस्त पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून, पोलीस या व्हिडीओच्या मदतीने तपास करत आहेत.
क्रिकेट खेल रहे युवाओं को हाथों में लाठी लिए दौड़ा दौड़ा कर पीटने वालों के कपड़े देख कर पहचानना बेहद आसान है ये कौन लोग है।
वीडियो के होते हुए भी संघियो पर खामोश क्यों है बुलडोजर वाला प्रशासन?
दोषियों पर हो कठोरतम कार्रवाई। pic.twitter.com/Pwsyy7lTAl
— Samajwadi Party (@samajwadiparty) May 8, 2022
मिळत असलेल्या माहितीनुसार या दोन गटात जागेवरून वाद झाला. आरएसएसच्या कार्यकर्त्यांना तिथे शाखा लावायची होती, तर विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित जागेवर शाखा लावली, यावेळी तिथेच हे विद्यार्थी देखील क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना बॉल संघाच्या शाखेत गेला. यावरूनच वाद सुरू झाला. वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. दोनही गट आपसात भिडले. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, व्हिडीओच्या मदतीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विद्यार्थी या मैदानात क्रिकेट खेळत होते. तर याच मैदानात दुसऱ्या एका जागेवर आरएसएसची शाखा सुरू होती. खेळताना एका विद्यार्थ्याने बॉल जोरात फटकावला. हा बॉल थेट आरएसएसच्या शाखेत गेला. आरएसएस कार्यकर्त्यांनी बॉल देण्यास नकार दिला. तुमच्या खेळण्यामुळे शाखा डिस्टप होत असल्याचे या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र विद्यार्थी बॉल परत देण्याच्या मागणीवर ठाम होते. यातूनच वाद सूरू झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. दोनही गट आपसात भिडले. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान एका गटाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.