PM Modi | लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींच देशवासियांना खास पत्र, पत्रातून काय दिली गारंटी?

| Updated on: Mar 16, 2024 | 10:32 AM

PM Modi | आज दुपारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांना खास पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून मोदींनी गारंटी दिली आहे. पुढच्या काही दिवसात देशात सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडालेला दिसेल. सध्या सर्वच पक्ष उमेदवार ठरवण्यात व्यस्त आहेत.

PM Modi | लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींच देशवासियांना खास पत्र, पत्रातून काय दिली गारंटी?
narendra modi
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा आज कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खास पत्र लिहिलं आहे. “तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या सोबतीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या 140 कोटी कुटुंबीयांसोबतच हे विश्वासाच, सहकार्याच आणि समर्थनाच नात माझ्यासाठी किती विशेष आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकतं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे. “माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल हेच मागच्या 10 वर्षातील आमच्या सरकारच यश आहे. आम्ही प्रत्येक धोरण, निर्णय या माध्यमातून गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा, त्यांना अजून सशक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्वांना पक्की घरे, सर्वांना वीज, पाणी, गॅस, आयुष्मान भारत योजनेद्वारे उपचाराची व्यवस्था, शेतकरी भाऊ-बहिणींना मदत, मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून माता-भगिनींना सहाय्यता हे सर्व प्रयत्न फक्त तुमच्या विश्वासाची साथ असल्यामुळे शक्य झालं” असं मोदी म्हणाले. “विकास आणि वारसा सोबत पुढे घेऊन जाणाऱ्या भारताने मागच्या एक दशकात पायाभूत सुविधांच अभूतपूर्व निर्माण पाहिलं. समृद्ध संस्कृती आणि परंपरेसोबत पुढे जाणाऱ्या देशाचा आज प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘तुमच्या विश्वासामुळे हे शक्य झालं’

“जीएसटी लागू करण, अनुच्छेद 370 संपवणं, तीन तलाकवर नवीन कायदा, संसदेत महिलांसाठी नारी शक्ति वंदन अधिनियम, नवीन संसद भवनाची निर्मिती, दहशतवाद-नक्षलवादावर कठोर प्रहार यासारखे ऐतिहासिक आणि मोठे निर्णय तुमच्या विश्वासामुळे घेऊ शकलो” असं मोदी यांनी म्हटलय.

मोदींनी पत्रातून काय गारंटी दिलीय?

“जनभागीदारी आणि जनसहयोग लोकशाहीच सौंदर्य आहे. तुमचा विश्वास आणि सहकार्यामुळे देशहितसाठी मोठे निर्णय, मोठ्या योजना लागू करण्यासाठी शक्ती आणि ऊर्जा मला मिळाली. विकसित भारताच्या निर्माणाचा संकल्प घेऊन आपण पुढे जातोय. त्यासाठी मला तुमचे विचार, सूचना आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुमचा आशीर्वाद आणि समर्थन मला मिळत राहील. राष्ट्रनिर्माणसाठी प्रयत्न न थकता सुरु राहतील. ही मोदींची गारंटी आहे” असं मोदींनी पत्रात लिहिलय.