कोलकाता : पश्चिम बंगालच्या जुलपाईगुडीमध्ये मैनगुडी परिसरात गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसला (Bengal Train Accident) रेल्वेला मोठा अपघात झाला आहे. गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे (Guwahati Bikaner Express Train Accident) बारा डबे रुळावरुन घसरल्याची माहिती एनडीआरएफच्या टीमनं दिली आहे. एनडीआरफचे (NDRF) डीजी अतुल करवल यांनी या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर, 50 प्रवासी जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती दिली आहे. गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे 12 डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे एनडीआरफच्या टीम सोबत मदतकार्यासाठी बीएसफचे 200 जवानांचं पथक दाखल झालं होतं. तर, रेल्वेमंत्री घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे रेल्वेकडून हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून मदतकार्यासंदर्भातील माहिती देखील दिल्याचं सांगितलं. मदतकार्यावर लक्ष ठेऊन असल्याचं देखील त्यांनी सांगितंलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेमुळं धक्का बसल्याचं सांगितलं आहे. मैनगुडीमध्ये बिकानेर गुवाहटी एक्स्प्रेसचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या उत्तर बंगाल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी डीएम, एसपी, आयजी उत्तर बंगाल यांना मदत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश देण्यात आल्याचं ममता बॅनर्जींनी ट्विट करुन म्हटलं आहे.
रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी बिकानेर गुवाहटी एक्स्प्रेसच्या अपघाताची माहिती नरेंद्र मोदी यांना दिलीय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील रेल्वेमंत्र्यासोबत चर्चा केली आहे. आश्विनी वैष्णव पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. तर राजस्थानातून भवंरसिंह भाटी आणि गोविंद राम मेघवाल हे दोन मंत्री पश्चिम बंगालकडे रवाना झाले आहेत.रेल्वेकडून अपघातातील मृतांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे.
Enhanced amount of ex-gratia compensation to the victims of this unfortunate accident:
Rs. 5 Lakh in case of death,
Rs. 1 Lakh towards grievous and
Rs. 25,000 for minor injuries.— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 13, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी या अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
रेल्वे मंत्रालयाकडून या अपघातानंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेकडून 03612731622, 03612731623 हे क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तर, बिकानेर 0151-2208222, जयपूर 0141-2725942, 9001199959 साठी हे क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
इतर बातम्या:
Video : बिकानेर एक्स्प्रेला मोठा अपघात! पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे डबे रुळावरून घसरले
Bengal Train Accident Patna Guwahati Bikaner Express derailed live updates in Mainaguri large number of people injured five deaths reported