Bibek Debroy Death News: आर्थिक आघाडीवर नरेंद्र मोदी यांचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे बिबेक देबरॉय यांचे शुक्रवार (69) वर्षी निधन झाले. या चाणक्याने गरीबांसाठी नवीन पद्धती आणल्या होत्या, ज्यांनी दिलेल्या सल्ल्यांमुळे रेल्वेला फायदा झाला. देशाला प्रगतीपथावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख आर्थिक सल्लागार परिषदेचे ते प्रमुख होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार असलेले बिबेक देबरॉय हे एम्समध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख प्रकट केले आहे. मोदी यांनी म्हटले की, बिबेक यांनी आपल्या कामातून भारताच्या बौद्धिक क्षेत्रावर आपली अमिट छाप सोडली आहे. अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि इतर विषयांत पारंगत असलेले ते उच्च दर्जाचे विद्वान होते.
25 जानेवरी 1955 रोजी बिबेक देबरॉय यांचा जन्म मेघालयमधील शिलांग येथे झाला. त्यांनी नरेंद्रपूर येथील रामकृष्ण मिशन शाळेत शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर कोलकातामधील प्रेसीडेंसी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि कॅम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यांनी पुणे येथील गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स एंड इकोनॉमिक्समध्ये कुलगुरुपदही भूषवले. जेव्हा मोदी यांनी योजना आयोगाच्या ऐवजी नीती आयोगचे गठण केले, त्यात त्यांना सदस्य करण्यात आले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते चेअरमन झाले. आर्थिक आघाडीवर ते मोदींचे चाणक्य होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले गेले होते.
अर्थशास्त्रज्ञ असलेले बिबेक देबरॉय हे एक चांगले लेखकसुद्धा होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखण केले होते. त्यांनी महाभारत, रामायण आणि भगवद् गीताचे संस्कृतमधून इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांचे आजी अजोबा बांगलादेशातून भारतात आले होते. त्यांचे वडील भारत सरकारच्या इंडियन ऑडिट एंड अकाउंट्स सर्व्हिसमध्ये होते.