रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज बारावा दिवस आहे. रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर मिसाईल हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनची शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनने शस्त्रे खाली ठेवावीत व आमच्या मागण्या मान्य कराव्यात तर आम्ही युक्रेनमधून सैन्य माघारी बोलावू असा इशारा रशियाने राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनला दिला आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्र युद्धबंदीसाठी रशियावर दबाव निर्माण करत आहेत. रशियावर घालण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांचा मोठा फटका हा जागतिक बाजारपेठेला बसला आहे. कच्चे तेल प्रति बॅरल 130 रुपयांवर पोहोचले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधणार आहेत. पुतीन आणि मोदी यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे आता अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
मोदी आणि पुतीन यांच्या चर्चेला महत्त्व प्राप्त होण्याचे कारण देखील खास आहे. या युद्धात भारताने मध्यस्ती करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या पंतप्रधानांनी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुतीन आणि मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे पाहंण आता महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी देखील युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला जावा अशी भूमिका भारताने घेतली होती.
भारताने रशिया युक्रेन युद्धात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत युद्धबंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावात रशियाच्या बाजून एकून बारा मते पडली. तर चीन भारत आणि युएईने तटस्थ राहाने पसंत केले. भारताने रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करावी अशी मागणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवला जावा अशी भूमिका भारताची आहे. त्यामुळे आता रशिया, युक्रेन युद्ध, रशियावर अमेरिका आणि इतर देशांनी लादलेले आर्थिक निर्बंध, निर्बंधांचा जागतिक बाजारपेठेवर होणारा परिणाम अशा सर्वच विषयांवर मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते.
Prime Minister Narendra Modi to speak to Russian President Vladimir Putin on the phone today: GoI sources
(file photos) pic.twitter.com/PkqIs0L4EM
— ANI (@ANI) March 7, 2022