आसाममध्ये गोमांस बंदीबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची घोषणा

| Updated on: Dec 04, 2024 | 9:09 PM

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी जाहीर केले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन तरतुदींचा समावेश करण्यासाठी गोमांस बंदीवरील विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आसाममध्ये गोमांस बंदीबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची घोषणा
Follow us on

Assam Beef Ban : आसाममध्ये बीफवर बंदी घालण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केलीये. आज आसामच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. ज्यामध्ये राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसवर बंदी घातली गेली आहे. गोमांस बंदीच्या या निर्णयानंतर आसामचे मंत्री पियुष हजारिका यांनी म्हटले की, मी आसाम काँग्रेसला आव्हान देतो की त्यांनी गोमांस बंदीचे स्वागत करावे नाहीतर पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हावे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले होते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी त्यांना पत्र लिहून मागणी केल्यास ते आसाममध्ये गोमांस बंदी करण्यास तयार आहेत.

आसाममधील काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपवर समगुरी विधानसभा मतदारसंघात बीफ पार्टी आयोजित केल्याचा आरोप केला होता. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्याचं आयोजन केल्याचा दावा त्यांनी केला होता. या विषयावर निवडणूक आयोगाने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.

हिमंता बिस्वा यांनी हुसैन यांच्या आरोपावर बोलताना म्हटले की, प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. मी भूपेन बोरा यांना पत्र लिहून रकीबुल हुसैन यांच्याप्रमाणे गोमांसावर बंदी घालण्याचे समर्थन करत आहे का, असे विचारेन, जर त्यांचे हो असेल तर मला कळवा, असे ते म्हणाले. मी पुढील विधानसभेच्या अधिवेशनात बीफवर पूर्णपणे बंदी घालणार आहे. मग भाजप, एजीपी, सीपीएम, कोणीही गोमांस देऊ शकणार नाही. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन या सर्वांनी गोमांस खाणे बंद केले पाहिजे असे ही ते म्हणाले.

गोहत्येबाबत भारतात कोणताही कायदा नाही. पण वेगवेगळी राज्ये असा कायदा बनवतात.  हरियाणात गोहत्याबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. छत्तीसगड हे एकमेव राज्य आहे जिथे गायी आणि म्हशीच्या मांसावरही बंदी आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, पुडुचेरी आणि अंदमान निकोबारमध्ये आंशिक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.