पाटणा: बिहार (Bihar) चे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी पकडले आहे. आरोपीनं नितीश कुमार यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिसांकडून (Bihar Police) मिळत असलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा व्यक्ती हा मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आलं आहे. मात्र, नितीश कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
#Video | बिहार #NitishKumar यांना मारहाण करण्याचा प्रयत्न, घटनेचा व्हिडीओ viral, बिहारच्या बख्तियारपूरमधील घटना, हल्लेखोराला अटक #Bihar #Video pic.twitter.com/k3Tx8LdbTb
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2022
पाटणा मधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांच्यावर एका युकवानं हल्ला केला. त्यानं नितीश कुमार यांना बुक्की मारली आहे. यामध्ये नितीश कुमार हे जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बख्तियारपूरमध्ये गेले होते.
बख्तियारपूरमध्ये एका मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मागील बाजूनं आलेल्या तरुणानं त्यांच्यावर हल्ला केला. नितीश कुमार एकटेच त्या मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी पुढं गेले होते. सुरक्षा रक्षंकांसारखी कपडे घातलेला व्यक्ती त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यानं नितीश कुमार यांच्यावर हल्ला केला. या सर्व प्रकारामुळं तिथं खळबळ उडाली. वेळीच सुरक्षा रक्षक सावधान झाल्यानं नितीशकुमार यांना हल्लेखोर काही करु शकला नाही.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला झाला होता. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तो हल्ला झाला होता. मधुबनी जिल्ह्यातील प्रचार सभेत एका व्यक्तीनं नितीशकुमार यांच्या दिशेनं कांदे आणि वीट फेकली होती. मात्र, त्यावेळी सुरक्षा रक्षकानं त्यांचा जीव वाचवला होता.
सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video