बिहारमध्ये दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंमूळे विरोधक मुख्यमंत्री नितीश कुमार यांचावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यावर नितीश कुमार यांनी आज प्रत्युत्तर दिले. “दारूबंदीनंतर काही लोक माझ्या विरोधात गेले, पण आम्ही नेहमीच लोकांचे आणि महिलांचे ऐकले, असे ते म्हणाले. दारूबंदीचा निर्णय सर्वानुमते राबवण्यात आला आहे, याचा लोकांना विसर पडला आहे. त्याला कोणत्या पक्षाचा विरोध होता का? सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांच्या संमतीने दारूबंदी लागू करण्यात आली होती,” ते म्हणाले.
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी ‘दारू प्यायली तर मराल’, असा प्रचार करायला हवा. दारू किती धोकादायक आहे हे लोकांना समजले पाहिजे. दारूबंदीबाबत पुन्हा व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मंगळवारी नितीश कुमार यांनी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत दारूबंदी कायद्याचा आढावा घेतला जाणार आहे. यासोबतच बनावट दारूच्या सेवनामुळे जे मृत्यू झाले आहेत, त्या घटनांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीला बिहार सरकारचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यांचे डीएम आणि एसपीही सहभागी होणार आहेत.
Some people have turned against me because I ordered a liquor ban & I’m serious about it. Those who are against it, feel bad. It’s a different matter, they might have their own opinion. But we listened to the people- both men & women. I stand against liquor: Bihar CM Nitish Kumar pic.twitter.com/ohc4KXyQnQ
— ANI (@ANI) November 15, 2021
2015 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2016 मध्ये दारूबंदीचा कायदा केला. याअंतर्गत बिहारमध्ये दारू विक्री आणि पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोबत असे करताना पकडल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बिहारमध्ये बनावट आणि विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे.
अलीकडेच गोपालगंज जिल्ह्यात सुमारे 40 लोकांचा आणि बेतिया जिल्ह्यातही 10 हून अधिक लोकांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. यानंतर विरोधकांसह मित्रपक्षांनीही दारूबंदीचा फेरविचार करण्यास सांगितले. त्याचवेळी खासदार चिराग पासवान यांनीही नितीश सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री नितीश कुमार दारू बनवणाऱ्या आणि तस्करांना संरक्षण देतात, त्यामुळे त्यांच घर सील करण्यात यावे, असा आरोप केला.
हे ही वाचा