नवी दिल्ली: महाराष्ट्रात एकीकडे राज्य सरकारनं सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे बिहारमधील (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारानं दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी दिलीय. दारुबंदी यशस्वी करण्याचं काम आता शिक्षक (Teacher) करणार आहेत. बिहारचे शिक्षक त्यांच्या विभागात आता गुप्तहेरांप्रमाणं काम करणार आहेत. नितीशकुमार यांच्या सरकारनं एका आदेशात शिक्षकांनी दारु विकणाऱ्या आणि पिणाऱ्यांची माहिती सरकारला द्यावी असं म्हटलंय. माहिती देणाऱ्या शिक्षकांची नावं गोपनीय ठेवली जाणार आहेत. बिहारच्या शिक्षण विभागानं शुक्रवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. बिहार सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं राज्यातील दारुबंदीची मोहीम यशस्वी होणार का हे पाहावं लागणार आहे. दारुबंदीचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय ठरला होता.
बिहारच्या शिक्षण विभागानं शुक्रवारी एख परिपत्रक जारी करत माध्यमिक, प्राथमिक, आणि माध्यमिक सरकारी शाळांचे प्राचार्य आणि शिक्षकांना दारु पिणाऱ्यांबद्दल आणि अवैध दारुच्या व्यवसायात सहभागी असलेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी हे पत्र जारी केलं आहे. या आदेशात प्राचार्य आणि शिक्षक यांनी शाळा बंद झाल्यानंतर शाळांचा वापर दारु पिण्यासाठी तर होत नाही हे पाहावे, असं म्हटलंय.
दारू विकणारे आणि दारु पिणारे यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या शिक्षकांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे. सरकारनं जारी केलेल्या क्रमांकात एक क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्या टोल फ्री नंबरवर संपर्क करुन शिक्षक दारूचे अड्डे यासंबंधी तक्रार करु शकतात. दारु पिल्यामुळं केवळ दारु पिणाऱ्यांच्याच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीवर देखील विपरीत परिणाम होतात हे दिसून आलंय, असं शिक्षण विभागाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
बिहार सरकारच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात शाळांच्या परिसराचा वापर दारु पिण्यासाठी आणि विक्रीसाठी होत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शालेय समिती स्थापन करुन दारुमुक्तीसाठी आवश्यक माहिती दिली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेतय
इतर बातम्या:
School Open| औरंगाबाद शहरात सोमवारपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग भरणार, मनपा प्रशासकांची परवानगी
Bihar Nitish Kumar Government issue order to teachers gave information of liquor smuggler and drunker