बिहार : मुलांचे अपहरण (Kidnapping) करुन त्यांचे लिंग (Gender) बदल करुन त्यांना किन्नर बवणाऱ्या टोळीचा बिहार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका किन्नरला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. चांदतारा असे अटक करण्यात आलेल्या किन्नरचे नाव आहे. चांदतारा हा दिसायला चांगले असणाऱ्या मुलांचे अपहरण करायचा आणि त्यांचे ऑपरेशन करुन लिंग बदलून त्यांना किन्नर बनवायचा. त्यानंतर भीक मागायला लावायचा. नुकतेच त्याने 10 वर्षाच्या दोन मुलांचे अपहरण केले होते. या मुलांचा शोध घेत असताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ही टोळी अतिशय हुशारीने आपले काम करत होती, ज्याची माहिती जाणून पोलीसही हैराण झाले आहेत. लखीसराय जिल्ह्यातील किउल पोलीस स्टेशन परिसरात नपुंसक बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे लोक मुलांचे अपहरण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे लिंग बदलायचे. (Bihar police exposes gang of kidnapping children and made transgender)
पोलिसांनी सांगितले की, नुकतेच दहा वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांना किन्नर बनवल्याची घटना समोर आली आहे. ही टोळी चांदतारा नावाची किन्नर चालवत होती. किउल पोलीस स्टेशन हद्दीतील वृंदावन येथे राहणाऱ्या अजय पासवान यांचा 10 वर्षाचा मुलगा हा आर्थिक विवंचनेमुळे भाजीपाला विकायचा. यादरम्यान चांदताराची नजर त्याच्यावर पडली. कुंदन दिसायला चांगला होता. त्यानंतर चांदताराने त्याला आमिष दाखवून आपल्या घरी आणले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करून त्याचा प्रायव्हेट पार्ट काढून त्याला नपुंसक बनवले. मग तो मुलगा चांदताराकडे भीक मागू लागला.
पोलिसांनी या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मुलाने चांदताराला विरोध केल्यानंतर तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या घटनेत, दिनेश यादव यांच्या मुलाला दोन वर्षांपूर्वी चांदताराने नेले आणि ऑपरेशन करून त्याला नपुंसक बनवले. हा मुलगा ट्रेनमध्ये आणि सिग्नलवर भीक मागतो. मात्र चांदताराने सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असे चांदताराचे म्हणणे आहे. या प्रकरणी कसून तपास करीत आहे. तपास पूर्ण होताच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्ह्याचे एसपी सुशील कुमार यांनी सांगितले. (Bihar police exposes gang of kidnapping children and made transgender)
इतर बातम्या