नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच गुजरातमध्ये धडकणार आहे. आता हे वादळ गुजरातच्या किनारी जिल्ह्यांच्या अगदी जवळ पोहोचला आहे. सध्या बिपरजॉय जखाऊ बंदरापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 110 किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूर्ण अलर्टवर आहे. वादळापूर्वीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्वारकेतील सुमारे 38 गावांमध्ये झाडे उन्मळून पडली आहेत.
गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 50 किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. अनेक कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, जिथे वादळाचा धोका सर्वाधिक आहे, तिथे सर्वत्र लष्कर आणि एनडीआरएफचे जवान तैनात आहेत. अनेक भागात समुद्राचे पाणी शिरल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आता ऑरेंज अलर्टचे रेड अलर्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
चक्रीवादळ दरम्यान हवेचा वेगासंदर्भातील गणित भारतीय हवामान विभागाने दिले आहे.
#WATCH | Gujarat: Strong winds and heavy rain lash Mandvi as 'Biparjoy' approaches Gujarat coast to make landfall today evening. pic.twitter.com/dCrp10RPlg
— ANI (@ANI) June 15, 2023
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटर असेल. एवढ्या जोराच्या वाऱ्यामुळे नुकसान होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 150 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी कार कुठेतरी आदळली की आत बसलेली व्यक्ती वाचत नाही, यावरुनच हवेचा वेग लक्षात येतो.
अरब महासागरात ६ जून रोजी चक्रीवादळ आले. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आले. बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे. त्याचा अर्थ संकट होते. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, म्यानमार, ओमान आणि मालदीव यांनी वादळांच्या नावांची यादी जागतिक हवामान संघटनेला दिली आहे. या देशांमध्ये कुठेतरी वादळ आले की त्या नावांवरून एक नाव निवडले जाते. यावेळी नाव ठेवण्याची पाळी बांगलादेशची असल्याने बांगलादेशने ‘बिपरजॉय’ असे नाव दिले. ही यादी पुढील 25 वर्षांसाठी तयार करण्यात आली आहे. 25 वर्षांपासून बनवलेली ही यादी तयार करताना दरवर्षी किमान पाच चक्रीवादळे होतील असे गृहीत धरले आहे.