सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या जाण्यानंतर संपूर्ण देश हळहळला. त्यांनी त्यांच्या अपघाताच्या काही काळ आधी एक मेसेज रेकॉर्ड केला होता. 1971 च्या युद्धात शहिद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली होती. देशाला त्यांनी 1971 च्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा करण्याचं आवाहनही केले होते. त्यांचा हा शेवटचा मसेज आता चर्चेत आला आहे.
भारतीय सेनेचा अभिमान आहे
त्यांनी रेकॉर्ड केलेल्या मेसेजमध्ये भारतीय सेनेवर गर्व असल्याची भावना व्यक्त केली होती. या सर्वांनी मिळून विजयपर्व साजरे करू, असंही त्यांनी म्हटले होते. भारतीय सेनेकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 1 मिनिट 9 सेकंदाचा आहे. ज्यात बिपीन रावत 1971 च्या विजयाबाबत सैन्याला आणि देशाला संदेश देत आहेत. हा व्हिडिओ 7 डिसेंबरच्या रात्री रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 8 डिसेंबरला सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर 11 जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.
विजयपर्व समारोह कार्यक्रमात हा व्हिडिओ चालवला
इंडिया गेट परिसरात आयोजित केलेल्या विजयपर्व कार्यक्रमातही हा व्हिडिओ चालवण्यात आला होता. ज्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. 16 डिसेंबर 1971 सा जवळपास 93 हजार पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सेनेच्या तिन्ही दलांनी आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. या ऐतिहासिक विजयानंतरच बांगलादेशची स्थापना झाली होती. 16 डिसेंबर 1978 ला बिपीन रावत यांचं सैन्यातील करिअर सुरू झाले होते. त्यानंतर ते लेफ्टनंट झाले. पुन्हा मेजर, अशी अनेक पदे भुषवत ते शेवटी देशाचे पहिले सीडीएस झाले. त्यांची सैन्यातील सेवा तब्बल 43 वर्षांची झाली. यात त्यांनी अनेक ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्वची भूमिका बजावली आहे.