bishnoi community and salman khan: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नाईचे नाव आले. त्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि काळवीट शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले. सलमान खान आणि बिश्नोई समाजातील वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाला आहे. कळवीट शिकर प्रकरणात सलमान खानवर बिश्नोई समाज नाराज आहे. 1998 पासून सुरु असलेला हा जुना वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. भारतीय बिश्नोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पुढाकर घेतला आहे. त्यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. सलमान खानने माफी मागितली तर बिश्नोई समाज त्याला माफ करेल, असे देवेंद्र बुडिया यांनी म्हटले आहे.
स्थानिक माध्यमांशी बोलताना भारतीय बिश्नोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सांगितले की, सलमान खान या ठिकाणी आला पाहिजे. त्याने आपली चूक कबूल करावी आणि माफी मागावी. त्यानंतर बिश्नाई समाजातील ज्येष्ठ मंडळी एकत्र बसतील आणि गुरु जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 नियमांनुसार माफी देण्याचा निर्णय घेऊ शकतात.
सलमान खान 1998 मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जोधपूरला गेला होता. चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावड गावाजवळ सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. सलमान खान याला तुरुंगात जावे लागले होते. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरु आहे. या घटनेमुळे बिश्नोई समाज सलमान खानवर नाराज आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या आणि त्यापूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले. त्यामुळे हा समाज सलमान खानला माफ करणार की नाही? ती चर्चा आता सुरु झाली आहे. त्यावर देवेंद्र बुडिया यांनी भूमिका स्पष्ट केली.
देवेंद्र बुडिया यांनी म्हटले की, बिश्नोई समाजचे जे 29 नियम आहेत त्यातील दहावा नियम क्षमा करण्यासंदर्भात आहे. आमचे धर्मगुरु भगवान जंभेश्वर यांनी हे 29 नियम बनवले आहे. त्यानुसार कोणी काही गुन्हा केला, त्यासाठी त्याने क्षमा मागितली, त्याच्या मनात क्षमा भाव असेल तर त्याला माफ करत येते. आमचा समाज कधी कोणाचे नुकसान करणार नाही. जेव्हा कोणी मनात क्षमाची भावना घेऊन येतो तेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोक एकत्र बसून त्याला माफ करण्याचा निर्णय घेतात.
हे ही वाचा…
550 वर्षे जुने नाते… बिष्णोई समाज काळवीटचा का करतो इतका आदर, सलमान खानने तोडले होते 9 नियम