भाजपकडून लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर, या कारणामुळे सनी देओलचे तिकीट रद्द

| Updated on: Mar 30, 2024 | 9:09 PM

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी नववी यादी जाहीर केली आहे. या यादीत २ महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांना भाजपने लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. कोण आहेत ते नेते जाणून घ्या.

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर, या कारणामुळे सनी देओलचे तिकीट रद्द
Follow us on

Loksabha election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत ओडिशा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दिनेश सिंह ‘बब्बू’ गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. तरनजीत सिंग संधू अमृतसरमधून, सुशील कुमार रिंकू जालंधरमधून, हंसराज हंस फरीदकोटमधून आणि प्रनीत कौर पटियाळामधून निवडणूक लढवणार आहेत.

मोठी गोष्ट म्हणजे सनी देओलचे गुरुदासपूरमधून तिकीट रद्द करण्यात आले आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यानेच निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे पक्षाने त्यांचे तिकीट रद्द केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी भाजपने दिल्लीऐवजी पंजाबमधील फरीदकोटमधून हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने उत्तर-पश्चिम दिल्लीतून योगेंद्र चंदौलिया यांना तिकीट दिले आहे. भर्त्रीहरी महताब हे पक्षाच्या वतीने कटक, ओडिशातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर राज्याच्या जाजपूर लोकसभा मतदारसंघातून रवींद्र नारायण बेहरा आणि कंधमालमधून सुकांत कुमार पाणिग्रही यांना तिकीट देण्यात आले आहे. देबाशीष धर हे पश्चिम बंगालच्या बीरभूम लोकसभा मतदारसंघातून तर प्रणत तुडू हे झारग्राममधून निवडणूक लढवत आहेत.

भाजपच्या या यादीत अनेक मोठी नावे पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांना पटियालामधून संधी दिली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या भरतरी मेहताब यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे.

गेल्या बुधवारी भाजपने 2 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये अमरावती मतदारसंघातून अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पक्षाने तिकीट दिले होते. विद्यमान खासदार ए नारायणस्वामी यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांना कर्नाटकच्या चित्रदुर्गातून तिकीट मिळाले आहे. नवनीत राणा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अमरावतीमधून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेचे नेते अनंतराव अडसूळ यांचा पराभव केला होता. अडसूळ हे शिंदे गटात आहेत.