तुम्हाला भाजपची उमेदवारी हवीय? मग हा चर्चेत असलेला ड्रॉप बॉक्स बघा; लक्षात ठेवा!

| Updated on: Dec 29, 2020 | 2:57 PM

गेल्या सहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरात सुरू असलेला करिश्मा आणि प्रत्येक राज्यात भाजपला मिळणारं हमखास यश या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. (BJP kept Drop Box in party office, will give common people a chance to become candidates)

तुम्हाला भाजपची उमेदवारी हवीय? मग हा चर्चेत असलेला ड्रॉप बॉक्स बघा; लक्षात ठेवा!
Follow us on

कोलकाता: गेल्या सहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरात सुरू असलेला करिश्मा आणि प्रत्येक राज्यात भाजपला मिळणारं हमखास यश या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. भाजपनेही या सर्वांना पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. पण पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनोखा फॉर्म्युला वापरला आहे. भाजपने त्यांच्या प्रदेश कार्यालयात एक बॉक्स ठेवला असून त्यात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. सर्व सामान्य व्यक्तीलाही तिकीट मिळावे म्हणून भाजपने हा फॉर्म्युला वापरला असला तरी त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. (BJP kept Drop Box in party office, will give common people a chance to become candidates)

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रचंड पैसा असलेल्या, मतदारसंघावर पकड असलेल्या व्यक्तीला उमदेवारी देण्यावर सर्वच राजकीय पक्षांचा भर असताना भाजपने मात्र सर्व सामान्य लोकांना पक्षाचं तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पक्ष कार्यालयात एक बॉक्स ठेवला आहे. ज्यांना तिकीट हवे असेल त्यांनी या बॉक्समध्ये आपला अर्ज भरावा, पक्ष त्याचा विचार करेल, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. अर्जामध्ये नाव, पत्ता, शिक्षण आणि इतर माहिती भरावी लागणार आहे. नोकरदारांपासून व्यापारी आणि गृहिणीपर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज भरू शकणार आहेत. हे अर्ज नंतर दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवले जाणार असून तिथेच योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची लोकप्रियता वाढत असून समाजातील विविध वर्गातील लोक पक्षात येऊ इच्छित आहेत, असं भाजपचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी सांगितलं.

आम आदमीला संधी

जे लोक सक्रिय राजकारणात नाहीत, पण त्यांना निवडणूक लढवायची आहे, असे अनेक लोक आहेत. त्या लोकांना संधी देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपचा जनसंपर्क वाढणार आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्यावेळीही भाजपने हा फंडा वापरला होता. पण त्यावेळी केवळ 1 हजार अर्जच आले होते. शिवाय योग्य उमेदवार नसल्याने कुणाचीही निवड करण्यात आली नव्हती. मात्र, तरीही भाजपने सामान्य लोकांना पक्षाकडे आकर्षिक करण्यासाठी पुन्हा एकदा हा फंडा वापरला आहे.

मिशन 200

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा नुकतेच बंगाल दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यात सरकार बनवण्याचा दावा केला होता. भाजपने राज्यात 200 हून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. आम्ही अधिकाधिक जागा जिंकून बहुमताचं सरकार स्थापन करू, असं शहा म्हणाले होते.

सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंतन बैठक सुरू आहे. केंद्रीय सह पर्यवेक्षक शिव प्रकाश यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीला केंद्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि केंद्रीय उपाध्यक्ष मुकूल रायसहित अनेक भाजप नेते उपस्थित आहेत. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केली जात आहे. (BJP kept Drop Box in party office, will give common people a chance to become candidates)

 

संबंधित बातम्या:

रजनीकांत यांची राजकारणातून माघार; कमल हसन पोकळी भरून काढणार?; वाचा सविस्तर रिपोर्ट

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; खासदार मनसुख वसावा यांचा पक्षाला रामराम

ममता बॅनर्जींचा बंगालच्या सुपुत्राला पाठिंबा, भाजपवर पुन्हा एकदा निशाणा

(BJP kept Drop Box in party office, will give common people a chance to become candidates)