Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपचा विशेष निवडणूक घोषवाक्यही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे 2014 पासूनचे निवडणूक घोषणावाक्य चर्चेत राहिले आहे. 2014 मध्ये ‘मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है’ असे घोषणावाक्य होते. त्यानंतर 2019 मध्ये ‘एक बार फिर मोदी सरकार’ असे घोषणावाक्य होते. आता 2024 च्या निवडणूक प्रचारासाठी खास घोषवाक्य तयार केले आहे. ‘सपने नहीं हकीकत को बुनते हैं-तभी तो सब मोदी को चुनते है’। असा नारा पक्षाने दिला आहे. हे घोषणा जनतेतूनच आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. लोकांच्या भावना समजून घेत हे घोषणावाक्य स्वीकारले असल्याचं पक्षाने म्हटले आहे.
नवमतदारासोबत पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. यादरम्यान त्यांनी एक विशेष व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी भारतीय लोकांची स्वप्ने कशी प्रत्यक्षात आणली हे सांगितले आहे. भाजपचा असा विश्वास आहे की पक्षाचा निवडणूक घोषवाक्य केवळ काही लोकांच्या नाही तर मोठ्या लोकसंख्येच्या भावनांशी जोडलेला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना हे अभियान संपूर्ण देशातील जनतेपर्यंत नेण्याचे आवाहन केले आहे.
#WATCH | BJP launches new campaign for the upcoming Lok Sabha elections 2024 – ‘Modi ko chunte hain’ pic.twitter.com/bblzdEMDDY
— ANI (@ANI) January 25, 2024
भाजप वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुकीचा प्रचार करणार आहे. या मोहिमेतील मुख्य गाणे आज रिलीज झाले आहे. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल होर्डिंग्ज, डिस्प्ले बॅनर आणि डिजिटल फिल्म्सच्या माध्यमातून प्रचार केला जाणर आहे. भाजपने यासाठी जोरदार नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी दिलेली आश्वासने कशी पूर्ण केली आहेत आणि कशी पुढे पूर्ण करणार आहेत यावर प्रचार केला जाणार आहे.