भाजप नेते आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; अर्ध्यातासापासून खलबतं सुरू

| Updated on: Jan 12, 2021 | 1:49 PM

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ भाजप नेते आशिष शेलारही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. (bjp leader ashish shelar meets sharad pawar in new delhi)

भाजप नेते आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; अर्ध्यातासापासून खलबतं सुरू
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ भाजप नेते आशिष शेलारही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शेलार अचानक पवारांच्या भेटीने आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत. (bjp leader ashish shelar meets sharad pawar in new delhi)

आशिष शेलार हे शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्ध्या तासांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, शेलार यांनी नेमकी कशासाठी पवारांची भेट घ्यायला आले आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पवार मुंबई-पुण्यात सतत असतात असं असताना त्यांची मुंबई किंवा पुण्यात भेट घेण्यासाठी शेलारांना दिल्ली का गाठावी लागली? असा सवाल केला जात आहे. शेलार-पवारांच्या अचानक होत असलेल्या या भेटीमुळे तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

शेलार हे एकटेच पवारांना भेटल्याचं सांगण्यात येतं. पवार-शेलारांची ही भेट राजकीय असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या आधी शेलार आणि पवार एका पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने एकत्रित आले होते. त्यावेळी शेलार यांनी मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. शेलार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शेलार यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ ओढवली होती.

दोन शक्यता?

गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोनल तीव्र करण्याचा निर्धार विरोधकांनी केला असून शरद पवार या कामाला लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात केंद्राची डोकेदुखी वाढणार आहे. शेतकरी आणि विरोधकांचा दबाव आल्यास केंद्राला कृषी कायदे रद्द करावे लागू शकतात. ही नामुष्की ओढवू नये म्हणून केंद्र सरकारने आतापासूनच हालचाली सुरू केल्या असून पवार-शेलार भेट हा त्या धाग्याचं एक टोक असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. कृषी कायद्याच्या निमित्ताने विरोधक एकत्र आल्यास भाजपला केरळ, पश्चिम बंगालसह पाच राज्यांची निवडणूक जड जाऊ शकते. ते घडू नये म्हणूनही केंद्र सरकार सक्रिय झाल्याचं सांगण्यात येतं.

दुसरं कारण म्हणजे ईडीच्या मुद्दयावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. केंद्राकडून ईडीचा राजकीय सूडबुद्धीतून वापर केला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यानुषंगानेही या बैठकीत काही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (bjp leader ashish shelar meets sharad pawar in new delhi)

 

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणासाठी खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार; शरद पवार, अशोक चव्हाणांची दिल्लीत चर्चा

अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांचेही आदेश पाळत नाहीत; विनायक मेटेंचा आरोप

… तर 50 टक्क्यांमध्ये समावून घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून चव्हाण दिल्लीत; मेटेंचा आरोप

(bjp leader ashish shelar meets sharad pawar in new delhi)