नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 350 प्लस सीट्सच टार्गेट ठेवलं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाचा 160 जागांवर पराभव झाला होता. त्याच जागा जिंकण्यासाठी भाजपाने फुलप्रूफ रणनिती आखली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कमकुवत जागांवर उमेदवावर उतरवण्याची तयारी सुरु केलीय. मिशन-160 मध्ये C-D कॅटेगरीच्या जागांवर उमेदवार निवडण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत जिथे पराभव झाला, त्या जागा जिंकण्यासाठी मोहीम सुरु केलीय.
भाजपाने मिशन-160 सीटसाठी 1 सप्टेंबरला पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात बैठक बोलवली आहे. . केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकीत सहभागी होतील. कमकुवत जागांवर कसा विजय मिळवायचा, यावर मंथन होणार आहे. 160 लोकसभा जागांवर प्रभारी नेत्यांसोबत समीक्षा करण्यात येईल.
का उमेदवारांची निवड आधीच करणार?
2019 लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर पराभव झाल, त्या जागा जिंकण्यासाठी भाजपाने शक्य ते सर्व प्रयत्न सुरु केलेत. भाजपाने त्या 160 जागांवर उमेदवार निवडण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. लोकसभेच्या ज्या जागांवर भाजपा कमकुवत आहे, तिथे उमेदवारांची आधीच निवड करुन तिकीट देण्याची तयारी आहे. एक सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत याच मुद्यांवर चर्चा होईल. उमेदवाराची आधीच निवड केल्यास उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
सी आणि डी कॅटेगरीत किती जागा?
2019 मध्ये लोकसभेच्या जा जागांवर पराभव झाला, त्या जिंकण्यासाठी भाजपा सर्व प्रयत्न करत आहे. लोकसभा प्रवास योजनेतंर्गत भाजपा त्या 160 जागांवर काम करत आहे. भाजपाने त्या 160 जागांना सी आणि डी कॅटेगरीमध्ये टाकलं आहे, त्यावरुन भाजपा या जागांसाठी किती गंभीर आहे ते लक्षात येतं. सी आणि डी कॅटेगरीत 80-80 जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर जेपी नड्डा यांच्यासह अमित शाह आणि पीएम मोदी यांची नजर असेल.