नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात भाजप (BJP) आमदारांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल (Ram Niwas Goel) यांनी सोमवारी भाजपच्या तीन आमदारांचे दिवसभरासाठी निलंबन केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात बाकावर उभा राहून आणि आप पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्याबद्दल भाजपच्या तीन आमदारांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले. या कारवाईनंतर भाजपकडूनही आपवर जोरदार टीका करण्यात आली.
विधानसभेच्या अध्यक्ष राम निवास गोयल यांनी आमदार अनिल वाजपेयी, जितेंद्र महाजन आणि अजय महावर यांना सभापतींनी खाली बसण्याची विनंती केल्यावरही ते बाकावर उभा राहिले त्यानंतर त्यांना जाण्यास सांगण्यात आले मात्र ते गेले नाहीत म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले.
#WATCH | Delhi: BJP MLAs Anil Bajpai, Jitender Mahajan & Ajay Mahawar dismissed from the House for the day for raising slogans while standing on benches; House was adjourned for 15mins.
AAP MLAs protested demanding apology from BJP over alleged derogatory remarks on CM Kejriwal. pic.twitter.com/jH4DwLZqKe
— ANI (@ANI) March 28, 2022
दिल्ली विधानसभेतून दिवसभरासाठी तीन आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर सकाळी दुसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले. दिल्ली सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजप आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी सुरु असतानाच आमदारांनी वेलमध्ये प्रवेश केला. यावेळी आपचे आमदार मोहिंदर गोयल यांनी गुप्ता यांनी माफी मागण्याचीही त्यांनी मागणी केली.
देश के लोगों को पिछले 75 सालों से रोका जा रहा है, लेकिन अब लोग रुकने वाले नहीं हैं। 2 राज्यों में लोगों ने “कट्टर ईमानदार” सरकार बना कर जवाब दे दिया है। भारत के लोग अब आगे बढ़ना चाहते हैं। pic.twitter.com/vScvcq4cyz
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 28, 2022
दिल्ली विधासभेतून भाजपच्या तीन आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर दिवसभर या गोष्टीची जोरदार चर्चा चालू होती. भाजपच्या आमदारांनी आपबद्दल आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानस्पद वागणूक दिल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली.
संबंधित बातम्या
दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या