एक, एक रुपया जमवून प्रचार, जमिनीवर झोपून काढतात रात्र, चार वेळा खासदार राहिलेला कोण आहेत ‘फक्कड बाबा’

| Updated on: Mar 12, 2024 | 8:07 AM

lok sabha election 2024: चौबे यांनी जे.पी.अंदोलनात सहभागी घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेकवेळा कारागृहात जावे लागले. त्यांनी बक्सर परिसराला आपली कर्मभूमी समजून काम केले. त्यांचे संपर्क कार्यालया म्हणजे एक लॉज होती. त्याच ठिकाणी त्यांना भेटणारे अनेक जण येत होते.

एक, एक रुपया जमवून प्रचार, जमिनीवर झोपून काढतात रात्र, चार वेळा खासदार राहिलेला कोण आहेत फक्कड बाबा
lalmuni chaubey
Follow us on

नवी दिल्ली |  आपल्याकडे साधा नगरसेवक झालेला व्यक्तीचा मोठा थाटमाट असतो. दिमतीला चारचाकी गाडी असते. कार्यकर्त्यांची नेहमी वर्दळ असते. मग आमदार- खासदार राहिला तर राजेशाही थाट असतो. मागे पुढे स्टेगन घेतले पोलीस असतात. परंतु एखादा व्यक्ती दोन, तीन नव्हे तर चार वेळा खासदार राहिल्यावर फक्कडच राहिला. त्याने एक, एक रुपया जमवून प्रचार केला असेल. प्रचारा दरम्यान जमिनीवर झोपून रात्र काढली…असे म्हटले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु ‘फक्कड बाबा’ नावाने प्रसिद्ध असलेले लालमुनी चौबे असेच काही वेगळे व्यक्ती होते. 1996 ते 2009 हा त्यांचा खासदारकीचा काळ होता. भाजपकडून ते निवडून येत होते. यापूर्वी ते 1972 पासून बिहारच्या विधानसभेचे ते सदस्य होते. 2016 मध्ये त्यांचे निधन झाले.

कोण आहे लालमुनी चौबे

भाजप खासदार लालमुनी चौबे आयुष्यभर प्रामाणिकपणाचे खरे प्रतीक राहिले. बिहारमधील बक्सर लोकसभा मतदार संघातून ते निवडून येत होते. त्यांच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक जीवनात पैशांशी त्यांना काहीच देणेघेणे नव्हते. ते साधी भाजी-पोळी खात होते. कुठेही पाणी प्यायचा, कुठेही झोपत असत. जे स्वतःकडे असलेला कपडा (रुमाल) जमिनीवर टाकून मोकळ्या आकाशाखाली झोपायचे. त्यांना कधी सुरक्षा रक्षकांची गरज वाटली नाही. बालपणापासून ते जनसंघाशी जुळले होते. लालमुनी चौबे 1972 मध्ये पहिल्यांदा चैनपूर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राजकीय क्षेत्रात ते मागे वळून पाहिले नाही.

डिझेल संपल्यावर असे होते होते

निवडणुकीत ते नेहमी जुन्या गाडीने प्रचार करत होते. जेव्हा रस्त्यात गाडीतील डिझेल संपत तेव्हा प्रचार थांबवत होते. एक, एक रुपया लोकांकडून जमा करुन गाडीत डिझेल भरत होते. अनेक वेळा ते पायीच निघून जात होते. त्यांच्या मतदार संघात त्यांना पायी फिरताना त्या काळातील सर्वच मतदारांनी पाहिले आहे. त्यांनी कधी शासकीय विश्रामगृहाचा वापर केला ना कधी सरकारी गाडी वापरली.

हे सुद्धा वाचा

अनेक वेळा कारागृहात

चौबे यांनी जे.पी.अंदोलनात सहभागी घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेकवेळा कारागृहात जावे लागले. त्यांनी बक्सर परिसराला आपली कर्मभूमी समजून काम केले. त्यांचे संपर्क कार्यालया म्हणजे एक लॉज होती. त्याच ठिकाणी त्यांना भेटणारे अनेक जण येत होते. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याशी त्यांचे वैयक्तीक संबंध होते. 2014 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यावेळी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. परंतु पक्षातील वरिष्ठांनी त्यांनी समजवल्यानंतर त्यांनी माघार घेतली.