Maneka gandhi | ISKCON च्या गोशाळेतील गायींवरुन मेनका गांधी यांचा मोठा आरोप

| Updated on: Sep 27, 2023 | 1:20 PM

Maneka gandhi | भाजपा खासदार मेनका गांधी यांनी ISKCON वर गंभीर आरोप केलाय. गोशाळेतून गायी खाटिकांना विकल्या जातात असं मेनका गांधी यांनी म्हटलय. इस्कॉनने या आरोपांवर काय म्हटलय?

Maneka gandhi | ISKCON च्या गोशाळेतील गायींवरुन मेनका गांधी यांचा मोठा आरोप
Maneka Gandhi
Follow us on

नवी दिल्ली : भाजपा खासदार मेनका गांधी यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (ISKCON) वर गंभीर आरोप केलाय. त्यांनी इस्कॉनची संपूर्ण संस्थाच फसवणूक करणारी असल्याच म्हटलं आहे. इस्कॉन आपल्या गोशाळेतून गायींची खाटिकांना विक्री करते, असा गंभीर आरोप मेनका गांधी यांनी केला. इस्कॉनने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलय. आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याच इस्कॉनने म्हटलं आहे. खासदार मेनका गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी या व्हिडिओमधून ISKCON वर आरोप केले आहेत. गोशाळा बनवण्यासाठी ते सरकारकडून जमीन घेतात. त्यानंतर त्याचा फायदा उचलतात असं मेनका गांधी म्हणाल्या. खासदार असण्याबरोबर मेनका गांधी प्राण्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत.

मेनका गांधी यांनी इस्कॉन संबंधीचा आपला अनुभव सुद्धा शेअर केलाय. “मी अलीकडेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील गोशाळेत गेली होते. इस्कॉनकडून या गोशाळेच संचालन केलं जातं. तिथे गायींचा अवस्था खूपच खराब होती. गोशाळेत एकही बछडा नव्हता. याचा अर्थ ते गायी विकून टाकतात” असा आरोप मेनका गांधी यांनी केला. ISKCON कडून या गायी खाटिकांना विकल्या जातात. ते त्यांना मारुन टाकतात. मेनका गांधी यांचा हा व्हिडिओ एका महिन्यापूर्वीचा असल्याच म्हटल जातय.

इस्कॉनचे म्हणणे काय ?

इस्कॉनने हे आरोप फेटाळून लावले आहे. इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ता युधीष्ठीर गोविंदा दास यांनी म्हटले आहे की संस्था केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर गायी आणि बैलांची सुरक्षा आणि देखभाल करते. आमच्या येथे गायींची सेवा त्यांच्या अखेपर्यंत केली जाते. त्यांनी खाटीकांना विकण्यात येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.