Lok Sabha Speaker Election 2024 : भाजपाच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली

| Updated on: Jun 26, 2024 | 11:19 AM

Lok Sabha Speaker Election 2024 : 1976 नंतर देशात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने उमेदवार उभा केल्याने लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या ओम बिर्ला यांनी निवडणुकीत बाजी मारली.

Lok Sabha Speaker Election 2024 : भाजपाच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
om birla and k.suresh
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

18 व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला. लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस उमेदवार के सुरेश रिंगणात होते. आज स्पीकरची निवड होईल. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड एक ऐतिहासिक क्षण  आहे. कारण भाजपाकडून सलग दुसऱ्यांदा एकाच व्यक्तीची स्पीकरपदी निवड होण्याची ही पहिली वेळ आहे.

INDIA आघाडीचे उमेदवार के. सुरेश केरळच्या मवेलीकाराचे प्रतिनिधीत्व करतात. ते 8 वेळा खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले आहेत. या निवडणुकीत त्यांचा मार्ग सोपा नव्हता. 543 सदस्यांच्या लोकसभेत सध्या 542 खासदार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही सीट खाली आहे. लोकसभेत 293 खासदार असलेल्या NDA कडे स्पष्ट बहुमत आहे. INDIA आघाडीकडे 236 खासदारांच संख्याबळ आहे. अपक्षासह अन्य एकूण 13 खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 271 मतांची आवश्यकता आहे.

1976 नंतर पहिल्यांदा होणार वोटिंग

काँग्रेसप्रणीत INDIA आघाडी विरोधी पक्षात असून त्यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी संख्याबळ नाहीय. तृणमुल काँग्रेसने इंडिया आघाडीने आमच्याशी चर्चा केली नाही, असं म्हटलय. TMC ने साथ दिली नाही, तर इंडिया आघाडीच संख्याबळ फक्त 204 राहील. लोकसभा अध्यक्षाची निवड सर्वसहमतीने होते. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. 1976 नंतर पहिल्यांदा लोकसभा स्पीकरच्या पदासाठी निवडणूक होत आहे.