चित्रा वाघ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत, पक्षाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या वरुण गांधींना डच्चू, वाचा नवी कार्यकारिणी

| Updated on: Oct 07, 2021 | 2:29 PM

जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे. (BJP National President JP Nadda announces new team of BJP national office bearers)

चित्रा वाघ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत, पक्षाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या वरुण गांधींना डच्चू, वाचा नवी कार्यकारिणी
chitra wagh
Follow us on

नवी दिल्ली: जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या कार्यकारिणीतून मनेका गांधी यांनाही वगळण्यात आलं आहे. नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदींचा समावेश कायम आहे. तर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारिणीत 309 सदस्य

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि लखीमपूर हिंसेवरून योगी सरकारला आरसा दाखवणारे वरुण गांधी यांना स्थान देण्यात आलं नाही. मात्र, मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातून कोण?

राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र

नितीन गडकरी
पीयूष गोयल
प्रकाश जावडेकर
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
चित्रा वाघ

राष्ट्रीय सचिव

विनोद तावडे
सुनील देवधर
पंकजा मुंडे

विशेष निमंत्रित

सुधीर मुनंगटीवार
आशिष शेलार
लड्डाराम नागवाणीं

राष्ट्रीय प्रवक्ते

सुनील वर्मा
हिना गावित

माजी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

राज्य प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील

महाराष्ट्राचे प्रभारी

सीटी रवी,
ओमप्रकाश धुर्वे
जयभान सिंग पवैय्या

 

संबंधित बातम्या: 

श्रीनगरमध्ये सरकारी शाळेवर दहशतवादी हल्ला! सर्वासामान्य नागरिकांवर गोळीबार, 2 शिक्षकांचा मृत्यू

गायीला वाचवताना डबल डेकर बस ट्रकवर धडकली, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, 13 प्रवाशांचा मृत्यू

तोपर्यंत मी लढतच राहणार, पीडितांच्या कुटुंबाला मी वचन दिलंय; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा

(BJP National President JP Nadda announces new team of BJP national office bearers)