पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या सभेपूर्वीच बॉम्बफेक, एक जखमी; बंगाल हादरले

| Updated on: Jan 19, 2021 | 6:56 PM

श्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या सभेच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. (BJP, TMC workers clash ahead of Suvendu Adhikari’s rally)

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या सभेपूर्वीच बॉम्बफेक, एक जखमी; बंगाल हादरले
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या सभेच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच या सभेच्या ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आल्याने या हल्ल्यात भाजपचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या बॉम्ब हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीनेच हा बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप भाजने केला आहे. तसेच या प्रकरणात राज्यपालांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणीही भाजपने केली आहे. (BJP, TMC workers clash ahead of Suvendu Adhikari’s rally)

सुवेंदू अधिकारी यांची आज खेजुरी येथे सभा आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. कालच ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून सुवेंदू यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपकडून या सभेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार होते. त्यासाठी संपूर्ण तयारी भाजपने केली होती. मात्र, सभा होण्यापूर्वीच अज्ञातांनी सभेच्या ठिकाणी घुसून भाजप कार्यकर्त्यांवर जोरदार हल्ले चढवले आणि बॉम्बफेक करून गोंधळ उडवू दिला. त्यामुळे सभेकडे जाणाऱ्यांमध्येही घबराट निर्माण झाली. बॉम्बफेक करणाऱ्यांनी सभेकडे जाणाऱ्यांनाही टार्गेट केलं होतं, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. टीएमसी कार्यकर्त्यांनी बराच वेळ सभेकडे येणाऱ्यांच्या दिशेने बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आमचे अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे. या ठिकाणी पोलिसांच मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सभा स्थळाला छावणीचं रुप आलं आहे.

राज्यपालांची भेट

दरम्यान, टीएमसीकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याची गंभीर दखल घेऊन राज्यापालांनी याप्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन केली आहे.

भाजप- टीएमसीच जोरदार शक्तीप्रदर्शन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी टीएमसी आणि भाजपमध्ये राज्यात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. कालच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या मतदारसंघात जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. यावेळी त्यांनी नंदिग्राममधून निवडणूक लढणार असल्याचं सांगून भाजपची झोप उडवून दिली होती. त्यावर सुवेंदू अधिकारी यांनीही ममता बॅनर्जी यांचं आव्हान स्वीकारलं असल्याचं सांगत ममता बॅनर्जींना पराभूत नाही केलं तर राजकारण सोडून देईल, असं स्पष्ट केलं होतं. कालच्या ममता बॅनर्जी यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी खजुरीमध्ये आज सभेचं आयोजन केलं होतं. मात्र या सभेपूर्वी बॉम्बफेक करण्यात आल्याने पश्चिम बंगाल हादरून गेलं आहे. (BJP, TMC workers clash ahead of Suvendu Adhikari’s rally)

 

संबंधित बातम्या:

नड्डा कोण आहेत, ज्यांना उत्तर देत फिरू! : राहुल गांधी

“भाजप माओवाद्यांपेक्षा भयंकर”,ममता बॅनर्जींचा घणाघाती आरोप

जिथं भाजपानं भगदाड पाडलं, तिथंच ममतांनी रणशिंग फुंकलं; कोण चितपट होणार?

(BJP, TMC workers clash ahead of Suvendu Adhikari’s rally)