भारतीय जनता पक्ष (भाजप) पंजाबचे अध्यक्ष अश्वानी शर्मा यांनी रविवारी घाषीत केले की 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमधील सर्व 117 मतदारसंघ भाजप लढवेल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान शर्मा म्हणाले, “राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व जागांवर निवडणूक लढवेल”. (BJP to fight on all 117 seats in Punjab state elections likely seat sharing with Capt Amarinder Singh)
गेल्या आठवड्यात, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संकेत दिले होते केले की त्यांचा नवीन राजकीय पक्ष भाजपसोबत जागावाटप करेल, जर कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी काही तोडगा काढला जाईल.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या राजकीय वादानंतर अमरिंदर सिंग यांनी सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.
I have today sent my resignation to @INCIndia President Ms Sonia Gandhi ji, listing my reasons for the resignation.
‘Punjab Lok Congress’ is the name of the new party. The registration is pending approval with the @ECISVEEP. The party symbol will be approved later. pic.twitter.com/Ha7f5HKouq
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) November 2, 2021
2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने 77 जागा जिंकून राज्यात पूर्ण बहुमत मिळवले होते आणि 10 वर्षांनंतर शिरोमणी अकाली दल-भाजपचं सरकार पाडलं होतं. आम आदमी पक्ष 20 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिरोमणी अकाली दल केवळ 15 जागा आणि भाजप 3 जागा जिंकू शकले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही हजेरी लावली. या बैठकीत आगामी सात राज्यांच्या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
Related News