लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर बहुमत मिळवले नाही. परंतु एनडीएची सत्ता आली. त्यानंतर त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळत आहे. राज्यातील 71 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्रिपुरामधील एकूण 6889 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील 4805 जागांवर भाजपला निवडणूक न लढता यश आले आहे. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुका होत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव असितकुमार दास यांनी म्हटले की, ग्रामपंचायतीमध्ये भाजपला एकूण 6,370 जागांपैकी 4,550 जागांवर यश मिळाले आहे. या ठिकाणी कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे भाजप उमेदवारास विजयी घोषीत करण्यात आले आहे. राज्यातील 71 टक्के जागांवर आता मतदान होणार नाही. ज्या 1,819 ग्रॉमपंचायतवर मतदान होणार त्यात भाजपाने 1,809 जागांवर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. माकपाने 1,222 तर काँग्रेसने 731 जागांवर उमेदवार दिले आहे. भाजप सहाकारी टिपरा मोथा पक्षाने 138 ठिकाणी उमेदवार उभे केले आहे.
पश्चिमी त्रिपुरा जिल्ह्यातील महेशखला पंचायत एका जागेवर मतदान होणार नाही. या ठिकाणी भाजप उमेदवाराच्या मृत्यूमुळे निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. राज्यातील 423 पंचायत समितीपैकी 235 पंचायत समितीवर बिनविरोध निवड झाली आहे. या एकूण 55 टक्के जागा आहे. आता राज्यात केवळ 188 सीट जागांवर मतदान होणार आहे. राज्यातील116 जिल्हा परिषदेपैकी 20 जागा बिनविरोध झाल्या आहे. त्या ठिकाणी भाजप उमेदवार विजयी झाले आहे. या एकूण जागांच्या 17 टक्के जागा आहेत.
त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 8 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्या ठिकाणी 22 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक होणाऱ्या ठिकाणी मतमोजणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 96 टक्के जागेवर भाजपने विजय मिळवला होता.