मोदी, शाह, हेमा मालिनींसह दिग्गजांना संधी; भाजपची पहिली यादी जशीच्या तशी

| Updated on: Mar 02, 2024 | 7:15 PM

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून लढणार आहेत. तर अमित शाह हे गुजरातच्या गांधी नगरमधून लढतील. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना तिकीट देण्यात आलं आहे.

मोदी, शाह, हेमा मालिनींसह दिग्गजांना संधी; भाजपची पहिली यादी जशीच्या तशी
ravi kishan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 2 मार्च 2023 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली आहे. इतर राजकीय पक्षांचा जागा वाटपाचा घोळ सुरू असतानाच भाजपने उमेदवारांची नावे जाहीर करून निवडणुकीचं रणशिंग अधिकृतपणे फुंकले आहे. भाजपने एकूण 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, स्मृती ईराणी आणि हेमा मालिनी यांची नावे आहेत. पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय दोन माजी मंत्र्यांनाही संधी देण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून लढणार आहेत. तर अमित शाह हे गुजरातच्या गांधी नगरमधून लढतील. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना तिकीट देण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना भोपाळच्या विदिशामधून तिकीट देण्यात आलं आहे. शिवराज सिंह चौहान सध्या आमदार आहेत.

तिवारी, हेमा मालिनी, रवी किशन लढणार

स्मृती ईरानी या अमेठीतून लढतील. लखनऊमधून राजनाथ सिंह यांना तर गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना तिकीट देण्यात आलंय. डुमरियागंजमधून जगदंबिका पाल, फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती, मथुरातून हेमा मालिनी, आग्रामधून सत्यपाल बघेल यांना तिकीट दिलं गेलंय. अभिनेता मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील गुना येथून ज्योतिरादित्य सिंधिया उभे राहणार आहेत.

कोणत्या राज्यात किती उमेदवार?

पहिल्या यादीत उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगना 9, आसाम 14, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे. तर मिनाक्षी लेखी आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

उमदेवारांची यादी…

क्रमांक – 1

 

क्रमांक – 2

क्रमांक – 3