श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील त्राल बस स्टँडवर एक स्फोट झाला (Blast in Tral). यात एकूण 7 लोक जखमी झाले आहेत. केंद्री राखीव पोलीस दलाने (CRPF) दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला करत स्फोट घडवला. ग्रेनेडचा हवेतच स्फोट झाला. त्यामुळे जास्त नुकसान झालं नाही. हा हल्ला सीआरपीएफच्या सैनिकांवर करण्यात आला होता (Blast in Tral Jammu Kashmir many people injured).
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आलाय. तसेत हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितलं, “त्रालच्या बस स्टँडवरील हा स्फोट ग्रेनेडमुळे झाल्याचा संशय यामुळे बळावला कारण तेथे ग्रेनेडची पिन सापडली. या स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
As per reports, a grenade has been hurled by terrorists at main bus stand in Tral, Pulwama which exploded in the air causing minor injuries to 6-7 civilians. The injured have been given first aid at a hospital. The area has been cordoned off & a search is underway: CRPF sources
— ANI (@ANI) June 6, 2021
सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना SDH त्राल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. जखमींपैकी एका रुग्णाची तब्येत गंभीर आहे. त्याला श्रीनगरला हलवण्यात आलंय. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे.
Blast in Tral Jammu Kashmir many people injured