नवी दिल्ली : जर्मन बॉडी बिल्डर आणि युट्यूब स्टार जो लिंडनर याचं वयाच्या 30व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. डोक्याची नस फाटल्याने त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. जो लिंडनरला जोएस्थेटिक्स या नावानेही ओळखलं जायचं. अवघ्या कमी वयात आपल्या बॉडी बिल्डिंगमुळे लोकप्रिय झाला होता. तो जगभरातील तरुणांचा प्रेरणास्त्रोत होता. मात्र, त्याचं अचानक निधन जाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
जो लिंडनरच्या निधनानंतर त्याचा मित्र नोएल डेजल याने शोक व्यक्त केला आहे. लिंडनरच्या आत्म्याला शांती मिळो. तुझा फोन येईल म्हणून मी नेहमी फोन चेक करायचो. जीमला जाण्याचा तुझा निरोप यायचा म्हणून मी सतत फोन चेक करत असतो. आता तुझ्या जाण्याने मी कोलमडून गेलो आहो. तू आमच्यासाठी अनेक महत्त्वाचे सल्ले दिलो होते. स्वत:चं आयुष्य आणि सोशल मीडियाच्याबाबत बरंच काही सांगितलं होतं. तुझी उदारता नेहमीच आमच्या स्मरणात राहील, असं नोएलने म्हटलं आहे.
जो लिंडनरने रश्मिका मंधाना अभिनित पोगारू या साऊथ इंडियन सिनेमातही काम केलं होतं. लिंडनरला एन्यूरिझ्म नावाचा धोकादायक आजार झाला होता. हा आजार साधारणपणे डोकं, पाय आणि पोटात होत असतो. भारतात या आजाराची फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा या आजाराने मृत्यू होतो.
या आजाराची लक्षणं सांगणं कठिण आहे. कारण त्याची लक्षणे बाहेर दिसत नाही. शरारीच्या एखाद्या भागातून अचानक रक्त येणं, हृदयाची धडधड अचानक वाढणे, नसांमध्ये प्रचंड वेदना होणं, चक्कर येणं, डोकं गरगरणं, डोळ्यांना वर किंवा खाली वेदना होणं, या आजााराची ही प्रमुख लक्षणे आहेत.
लिंडनरच्या निधनाने त्याची गर्लफ्रेंड immapeaches सुद्धा कोलमडून गेली आहे. तिने इन्स्टाग्रामवरून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. जो अत्यंत भला माणूस होता. एन्यूरिझ्म आजाराने त्याचं निधन झालंय. त्यावेळी मी त्याच्यासोबत रुममध्ये होते. माझ्यासाठी बनवलेला हार त्याने माझ्या गळ्यात घातला होता. आम्ही गळ्यात गळा घालून पहुडलो होतो. तो संध्याकाळी जीममध्ये जाण्याची वाट पाहत होता. खरं तर तीन दिवसांपूर्वीच त्याच्या गळ्यात वेदना होत होत्या. त्याने मला सांगितलंही होतं. मात्र, जेव्हा वेळ निघून गेली होती, तेव्हा आम्हाला त्याचा अंदाज आला. यावर मी आता अधिक काही लिहू शकत नाही, असं तिने म्हटलंय.
तुम्ही जो लिंडनरला जेवढं ओळखता त्यापेक्षा तो किती तरी चांगला होता. तो खूपच मधूर, दयाळू, मजबूत आणि कठोर मेहनत करणारा होता. तो प्रामाणिक आणि स्मार्ट मुलगा होता. त्याने आपल्या चाहत्यांनो प्रोत्साहित करण्यासाठी खूपच काम केलं आहे. तो लोकांना प्रेरणा देत होता. त्यामुळेच मी आराम करू शकत नाही किंवा आराम करू शकत नाही, असं तो म्हणायचा, असंही तिने म्हटलंय.