नूडल्स खाल्ल्यामुळे 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू का? संपूर्ण कुटुंब रुग्णालयात

| Updated on: May 13, 2024 | 12:32 PM

नूडल्स खाल्ल्यामुळे एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नूडल्स आणि तांदूळ खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तीन मुलांसह सहा सदस्य आजारी पडले.

नूडल्स खाल्ल्यामुळे 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू का? संपूर्ण कुटुंब रुग्णालयात
Noodles
Follow us on

नूडल्स खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 6 लोक आजारी पडले. यात 12 वर्षाच्या एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फूड पॉयजनिंगमुळे हे कुटुंब आजारी पडलं. खाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दाव्याच खंडन केलं. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरनपूर भागात गुरुवारी रात्री नूडल्स आणि तांदूळ खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तीन मुलांसह सहा सदस्य आजारी पडले. त्यांनी सांगितलं की, “एका खासगी रुग्णालयात या कुटुंबाला दाखल केलं. तब्येत सुधारल्यानंतर ते घरी परतले. त्याच रात्री पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागलं” उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील ही घटना आहे.

न्यूज एजन्सीच्या रिपोर्ट्नुसार, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, ’12 वर्षाच्या रोहनची तब्येत बिघडली. काहीवेळात त्याचा मृत्यू झाला’ सामुदायिक स्वास्थ्य केंद्राचे (सीएचसी) डॉक्टर राशिद यांच्यानुसार, ‘शनिवारी फूड पॉयजनिंगच्या तक्रारीनंतर पाच लोकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दुसरा मुलगा विवेकची स्थिती गंभीर असल्याने त्याला बरेली जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अन्य चौघांची प्रकृती स्थिर आहे.

विशेष ब्रांडचे नूडल्स खाल्ले

या प्रकरणाची सुरुवातीला चौकशी करणारे सहायक आयुक्त खाद्य (द्वितीय) शशांक त्रिपाठी यांनी सांगितलं की, “कुटुंबाने जनरल स्टोरमधून विकत घेतलेले विशेष ब्रांडचे नूडल्स खाल्ले होते. काही अन्य लोकांनी सुद्धा त्याच ब्रांडचे नूडल्स विकत घेतले होते. पण त्यांच्यासोबत असं काही घडलं नाही”

शक्यता काय आहे?

शशांक त्रिपाठी म्हणाले की, ‘नूडल्स शिवाय दुसरं अन्य काही खाल्ल्यामुळे ते आजारी पडल्याची एक शक्यता आहे’ पूरनपुर उप-विभागीय मजिस्ट्रेटना त्यांनी आपल्या निष्कर्षाबद्दल सांगितलं. कुटुंबातील सदस्यांनी अजून या बद्दल कुठलीही तक्रार दिलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं.