मुंबई : लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या वळणावर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होत असते. आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं. त्यासाठी काही दिवसआधीच घरातील व्यक्ती तयारीला लागतात. पण कधी-कधी लग्नाच्या दिवशीच लग्न मोडल्याच्या वेगवेगळ्या घटना आपल्या ऐकल्या असतील. अशीच एक घटना एका नवरदेवासोबत घडली आहे. आपल्याच लग्नात डायलॉग मारणं एका वराला महागात पडलं आहे. लग्नाच्या स्टेजवर त्याने हा डायलॉग मारला आणि नवरीने लग्नासाठीच नकार देऊन टाकला.
नवरदेवाने स्टेजवर आशिक भी हू कातिल भी हू असा डायलॉग मारला आणि वधूपक्षासह तेथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे पाहातच राहिले. सुरुवातीला लोकांना वाटले की वराने फिल्मी स्टाईलमध्ये एन्ट्री घेतली आहे, परंतु वराचे संवाद आणि कृती पाहून वधूने थेट लग्नास नकार देऊन टाकला. एवढेच नाही तर यानंतर पोलिसांनाही पाचारण करावे लागले.
ही घटना आहे मऊ जिल्ह्यातील कोपागंज या भागातील. लग्नाची मिरवणूक धुमधडाक्यात काढण्यात आली होती. मुलीकडच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात त्यांचे स्वागत केले. यानंतर लग्नाची तयारी सुरु झाली. स्टेजवर वर चित्रपटातील डायलॉग मारु लागला आणि मग थेट लग्नच मोडलं. त्याला खूप लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकत नव्हता.
सगळ्यांनी समजवल्यानंतर ही तो मानत नसल्याने त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे लोकांना समजले. बळजबरीने लग्न करून वधू काढून घेण्यावर तो ठाम होता. लोकांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. वधूने नकार दिल्यानंतर ही तो तेथून जाण्यास तयार नव्हता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून वराला पोलीस ठाण्यात नेले. मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न लावणार नाही असा निर्णय घेतला होता. लग्नात झालेला खर्च मुलाच्या कुटुंबीयांकडून वसूल करुन देण्याची मागणी त्यांनी पोलिसांना केली आहे.
जयमाला समारंभादरम्यान मुलाचे विचित्र कृत्य पाहून पाहुणे हैराण झाले. 3 तास लोकांनी समजवूनही तो शांत झाला नाही. यावर पोलिसांना पाचारण करावे लागले. यावेळी तो पोलिसांसमोर देखील स्टेजवर वेड्यासारखे वागत होता.
लग्नाला उपस्थित असलेल्या मुलीच्या काकांनी सांगितले की, समारंभात मुलाने जयमालाला हातही लावला नाही. त्याची कृत्ये पाहून सुरुवातीला लोकांना वाटले की तो आजारी असेल. यावर त्याला पाणी देऊन समजावून सांगितले, मात्र तो समजून घेण्याऐवजी शिवीगाळ करत होता.