आयोध्या : सध्या देशात जे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरून जे राजकारण सुरू आहे त्याचे रणशिंग महाराष्ट्रात फुकण्यात आले आहे. हे रणशिंग मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी फुकंले. तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्रातील मशींदीवरील भोंगे हे उतरलेच पाहिजेत अशी भूमिका घेतली होती. तर आपण अयोध्येला जात श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर महाराष्ट्रात भाजपने आपल्या सोबत मनसेला घेत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दुसरीकडे आता भाजपचीच डोकेदुख वाढण्याचे चित्र दिसत आहे. याचे कारण कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण सिंह (MP Brijbhushan Singh) . ब्रिजभूषण यांनी थेट भाजपला फाट्यावर मारत राज ठाकरे यांना विरोध करत खुले आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे आवाहन केले आहे. आणि जर तसे केले नाही तर राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना डीवचताना, हनुमान राज ठाकरेंना सद्दबुद्धी देवो असे म्हटले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील राजकारण हे चांगलेच तापलेले आहे.
ब्रिजभूषण यांनी थेट भाजप कोंडी करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यावर ब्रिजभूषण यांनी पुन्हा एकदा टीका करत, हनुमान राज ठाकरेंना सद्दबुद्धी देवो असे म्हटले आहे.
ब्रिजभूषण यांनी यावेळी अयोध्या दाखल होत तेथील हनुमान गढ़ीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी तेथे पुजा केली. तर त्यांनी पीठाधीश्वरला भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी हनुमान राज ठाकरेंना सद्दबुद्धी देवो असे म्हटले आहे. तसेच ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी असे पुन्हा म्हटले आहे.
अजान, हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. पण त्यांनाही ब्रिजभूषण यांनी अल्टिमेटम दिला असून उत्तर भारतीयांची माफी मागितल्या शिवाय अयोध्येत येऊ देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांना भाजप जास्त प्रिय वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी उभारून देशाची माफी गावावी, उत्तर भारतीयांची माफी. माफी मागितली तरच राज ठाकरे यांनी अयोध्येत येऊ देऊ. अन्यथा अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.