Budget 2024-25 Date: मोदी सरकार 23 जुलै रोजी सादर करणार अर्थसंकल्प

| Updated on: Jul 06, 2024 | 5:15 PM

Budget 2024-25 : संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी माहिती दिली की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Budget 2024-25 Date: मोदी सरकार 23 जुलै रोजी सादर करणार अर्थसंकल्प
राष्ट्रीय लोकशाही आघडी सरकारच्या कार्यकाळात या पंरपरेला फाटा देण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी 2001 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता केली. बजेट सादर केले.
Follow us on

देशात 18 व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे. ज्यामध्ये नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. संसदेचे हे अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये मोदी 3.0 सरकार करदात्यांसाठी काही मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. केंद्र सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण घरांसाठी राज्य अनुदान वाढवण्याची तयारी करत आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

निर्मला सितारामन यांचा रेकॉर्ड

निवडणुकीचं वर्ष असल्याने या वर्षी दोनदा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. ते मोरारजी देसाईं यांना मागे टाकतील. देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते.

संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले होते की, अर्थसंकल्पात अनेक मोठे सामाजिक आणि आर्थिक निर्णय घेतले जातील. ते म्हणाले होते, “अर्थसंकल्पात मोठे आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेतले जातील आणि अनेक ऐतिहासिक पावले उचलली जातील. देशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सुधारणांचा वेग वाढवला जाईल.”