देशातील 3 लोकसभा आणि 29 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकींचा काल निकाल लागला. या निकालानंतर अनेक राजकीय संदेश मिळतात आणि जनतेचा कौल कुठे आहे त्याचा अंदाज येतोय. 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी आलेल्या या निकालानी राजकीय पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. पोटनिवडणुकीत ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे त्यांना फायदा होण्याचा ट्रेंड दिसला. कालच्या निकालात राजकीय प्रादेशीक पक्षपण आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत. काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले, मात्र भाजपासाठी कालचे निकाल चिंता वाढवणारे ठरले. हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, तर काँग्रेससाठी 2022 च्या निवडणुकीपूर्वी ती प्रोत्साहनाची घंटा मानली जात आहे. (By elections result Bjp lost in himachal pradesh is a worry ahead of 2022, elections congress wins)
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. हिमाचलमधील लोकसभेच्या मंडी जागेवर आणि विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. या चारही जागा काँग्रेसने जिंकल्या. मंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती. हिमाचलमधील पराभवामुळे भाजपमध्ये चिंतेची लाट पसरली आहे.
जुब्बल-कोटखाईजागेवर भाजपला डिपॉझीट पण वाचवता आलेला नाही इतके कमी मतं मिळाली. हिमाचलचे हे निकाल भाजपसाठीही अडचणीचे ठरणार आहेत कारण पुढील वर्षाच्या शेवटी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि ही पोटनिवडणुक 2022 ची सेमीफायल मानली जात होती. अशा स्थितीत पोटनिवडणुकीचे हे निकाल काँग्रेससाठी टॉनिक ठरू शकतात. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नीचा निवडणूक जिंकणे हिमाचलमध्ये काँग्रेससाठी उत्साह वाढवणारे आहे.
कांग्रेस की हर जीत हमारी पार्टी के कार्यकर्ता की जीत है।
नफ़रत के ख़िलाफ़ लड़ते रहो। डरो मत!Every victory for the Congress is a victory of our party worker.
Keep fighting hate. No fear! #BypollResults2021— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 2, 2021
पोटनिवडणुकीच्या निकालाने हेही स्पष्ट केले आहे की, ज्या राज्यात जो पक्ष सत्तेत आहे, त्यानेच पोटनिवडणुकीचीही जागा जिंकली. उदाहरणार्थ, आसाममध्ये भाजपचे सरकार आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तिथल्या पाचही विधानसभा जागा जिंकल्या. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे आणि दोन्ही जागा काँग्रेसने काबीज केल्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे आणि ममता यांच्या पक्षाने तिथल्या चारही विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जिंकली. मात्र, हिमाचलही याला अपवाद ठरले. हिमाचलमध्ये भाजपचे सरकार आहे, पण तिथल्या तीनही विधानसभा जागा काँग्रेसने जिंकल्या.
याच वर्षी हरियाणातील एलेनाबाद विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. इंडियन नॅशनल लोकदलाचे अभय चौटाला येथे आमदार होते आणि त्यांनी कृषी कायद्याच्या निषे म्हणून जानेवारीत राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत अभय सिंह पुन्हा विजयी झाले. राकेश टिकैत आणि गुरनाम सिंह चदुनी या शेतकरी नेत्यांनी येथे येऊन भाजपला विरोध केला होता. त्याचा परिणाम येथेही दिसून आला असावा.
Related News
By elections result Bjp lost in himachal pradesh is a worry ahead of 2022 elections congress wins