संकटात असणारी एडटेक कंपनी बायजूस ( Byju Crisis) चे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्यासमोरील संकट कमी होत नाही. वर्षभरापूर्वी ते जगातील श्रीमतांच्या यादीत होते. 2023 मध्ये त्यांच्याकडे 17,545 संपत्ती होती. परंतु आता त्यांची नेट वर्थ शून्य झाली आहे. फोर्ब्स बिलियनेयर इंडेक्स 2024 मध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम कंपनीवर तिचा मोठा प्रभाव पडला आहे.
फोर्ब्सच्या बिलेनियर लिस्टमध्ये बायजू यांचा समावेश होता. परंतु मागील वर्षाच्या यादीत चार लोक बाहेर झाले. त्यात रवींद्रन यांचा समावेश आहे. नुकतेच ब्लॅकरॉकने बायजू यांचे मूल्य कमी करुन 1 दक्षलक्ष डॉलर केले होते. 2022 मध्ये हेच मूल्य 22 दक्षलक्ष डॉलर होते.
Byju’s या स्टार्टअपची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी देशात सर्वात वेगाने प्रगती करणारे हे स्टार्टअप झाले होते. बायजू रवींद्रन यांनी इनोव्हेटिव्ह लर्निंग अॅपसोबत शैक्षणिक क्षेत्रात क्रांती आणली होती. प्राथमिक शिक्षणापासून एमबीएच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते शिक्षण देत होते. घराघराततपर्यंत अॅपच्या माध्यमातून शिक्षण नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
बायजू रवींद्रन गणिताचे शिक्षक होते. त्यांनी बायजूसची स्थापना करुन त्याचे मूल्य 22 दक्षलक्ष डॉलरपर्यंत वाढवले होते. आता बायजूला मिळालेल्या विदेशी गुंतवणुकीचा तपास ईडीकडून केला जात आहे. नुकतेच ईडीने रवींद्रन यांच्याविरोधात लुकआउट नोटीस काढली होती. तसेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट एक्ट (FEMA) नुसार Byju’s ची पेरेंट कंपनी थिंक एंड लर्न ला ‘कारणे दाखवा’ नोटिस देण्यात आली. कंपनीच्या खालवलेल्या कामगिरीमुळे बायजू रवींद्रन यांच्यावर तीव्र टीका झाली. प्रोसस एनवी आणि पीक एक्सवी पार्टनर्स समेत कंपनीचे स्टेकहोल्डर्स रवींद्रन यांना सीईओ पदावरुन काढण्याचा प्रयत्न करत आहे.