नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आल्यानंतर आता कॅबिनेट कमिट्यांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. कॅबिनेट कमिट्यांमध्ये नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नारायण राणेंपासून ते मनसुख मंडवियांपर्यंत अनेक मंत्र्यांना कॅबिनेट कमिट्यांवर घेण्यात आले आहे. (Cabinet Committee Changes Narayan rane, Mansukh Mandaviya Jyotiraditya Scindia, Smriti Irani Centre Cabinet)
इन्व्हेन्सटमेंट अँड ग्रोथ कमिटीमध्ये नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असते. तर रोजगार आणि स्किलशी संबंधित कमिटीमध्ये धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपदही पंतप्रधानांकडे आहे.
पार्लिमेंट्री अफेयर्सच्या कॅबिनेट कमिटीत अर्जुन मुंडा, विरेंद्र कुमार, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. तर पॉलिटिकल अफेयर्सशी संबंधित कमिटीत स्मृती ईराणी, सर्वानंद सोनोवाल, गिरीराज सिंह, मनसुख मंडविया, भूपेंद्र यांचा समावेस करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार करताना 12 केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामे दिले होते. त्यामुळे अनेक समित्यातील पदे रिक्त झाली होती. त्यामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Cabinet Committee Changes Narayan rane, Mansukh Mandaviya Jyotiraditya Scindia, Smriti Irani Centre Cabinet)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |https://t.co/B59SHuz9oC#News | #NewsUpdates |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या:
‘देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही’, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, चर्चांना उधाण
(Cabinet Committee Changes Narayan rane, Mansukh Mandaviya Jyotiraditya Scindia, Smriti Irani Centre Cabinet)