nitin gadkari
Image Credit source: TV9MARATHI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 72 खासदारांनी मंत्रिपदाची आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी यांच्या शपथविधीनंतर खातेवाटपाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे केले जात होते. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये कुणाला कोणतं खातं देण्यात येतं? याबाबत उत्सुकता होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारकडून खातेवाटप करण्यात आलं आहे. अर्थात हे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. पण सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
देशाच्या राजकारणातील सध्याच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर आता सूत्रांकडून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रस्ते विकास आणि परिवहन खातं देण्यात आलं आहे. अमित शाह यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं. तर राजनाथ सिंह यांना संरक्षणमंत्री देण्यात आलं आहे. तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय देण्यात आलं आहे.
मोदी सरकारचं खातेवाटप 2024
- राजनाथ सिंह – संरक्षण (Defence Minstry)
- अमित शाह – गृह (Home Ministry)
- अश्विनी वैष्णव – रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय (Ministry of Information and Broadcasting and Railway Ministry)
- एस. जयशंकर – परराष्ट्र (Foreign)
- नितीन गडकरी – परिवहन, रस्ते विकास (Transport, Road Development Ministry)
- अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री (Transport Ministry)
- हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री (Transport Ministry)
- मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय (Energy Ministry)
- शिवराज सिंह चौहान – कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय (Agriculture / Panchayat Ministry)
- जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME)
- निर्मला सीतारमण – अर्थ मंत्रालय (Finance Ministry)
- सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय (Ministry of water power)
- जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय (Health Ministry)
- चिराग पासवान- क्रीडा (Ministry of Sport)
- किरेन रिजिजू – संसदीय कार्य (Parliamentary Affairs Ministry)
- मनसुख मांडविया – कामगार (Ministry of Labour)
- श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री (Energy Ministry)
- अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास (Women and Child Development Ministry)
- राम मोहन नायडू – नागरी उड्डाण (Ministry of Civil Aviation)
- सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग (Ministry of Port Shipping)
- शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री (Ministry of Port Shipping)
- शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री (MSME)
- धर्मेंद्र प्रधान – शिक्षण (Education Ministry)
- एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग (Ministry of heavy industries)
- शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री (MSME)
- ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम (Telecom Ministry)
- भूपेंद्र यादव – पर्यावरण (Ministry of Environment)
- प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण (Ministry of Consumer Affairs)
- रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक राज्यमंत्री (Ministry of Minority)
- गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक (Art, tourism and culture Ministry)
- सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री (Art, tourism and culture Ministry)
- पीयूष गोयल – वाणिज्य (Ministry of Commerce)
महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेट मंत्रीपद आणि 4 खासदारांना राज्यमंत्रीपद
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेटमंत्री करण्यात आलं आहे. तर 4 खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या एकाही खासदारा मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.