नवी दिल्ली : मागच्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत चालले होते. आता दोन्ही देशातील तणाव टिपेला पोहोचला आहे. संबंध खराब असले, तरी दोन्ही देशातील व्यापार मात्र चांगला आहे. कूटनीतिक स्तरावर जो तणाव निर्माण झालाय, त्याचा परिणाम आता व्यापारावर होणार आहे. खलिस्तानी समर्थकांना कॅनडामध्ये आश्रय दिला जातो, हे दोन्ही देशातील संबंध बिघडण्यामागच मुख्य कारण आहे. कॅनडामध्ये सक्रीय असलेल्या खलिस्तानी गटांवर जस्टिन ट्रूडो सरकारने कारवाई केली नाही, असा भारत सरकारच म्हणणं आहे. हा तणाव आणि वादवादी दरम्यान भारतात मागच्या आठवड्यात G20 संम्मेलन झालं, त्यात सहभागी होण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो भारतात आले होते. परिषद झाल्यानंतर आणखी दोन दिवस ट्रूडो भारतातच होते. कारण त्यांचं खासगी विमान बिघडलं होतं.
कॅनडाला गेल्यानंतर जस्टिन ट्रूडो यांनी भारतासोबत ट्रेड मिशन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि कॅनडामध्ये आयात-निर्यात बरोबरीची आहे. वित्त वर्ष 2022-23 मध्ये भारताने कॅनडाला 4.10 अब्ज डॉलरच सामान निर्यात केलं. तेच कॅनडाने भारताला 2022-23 मध्ये 4.05 अब्ज डॉलरच सामान निर्यात केलं. भारत आणि कॅनडामध्ये व्यापार प्रक्रिया सहजसोपी असल्याने भारताने मोठी गुंतवणूक सुद्धा केली आहे. कॅनडाच्या पेंशन फंडाने भारतात 55 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलीय. कॅनडाने वर्ष 2000 पासून आतापर्यंत भारतात 4.07 अब्ज डॉलरची थेट गुंतवणूक केलीय. भारतात सध्या 600 कॅनडीयन कंपन्या काम करत आहेत. 1000 कंपन्या भारतात एन्ट्री करण्यासाठी रांगेत आहेत. भारतीय आयटी कंपन्यांना कॅनडामध्ये मोठा व्यवसाय आहे. त्याशिवाय सॉफ्टवेअर, नॅच्युरल रिसोर्सेज आणि बँकिंग सेक्टरमध्ये भारतीय कंपन्या सक्रीय आहेत.
भारत आणि कॅनडामध्ये कुठल्या वस्तूंचा व्यापार आहे?
भारत आणि कॅनडामध्ये कुठल्या, कुठल्या वस्तूंचा व्यापार होतो, ते जाणून घ्या. कॅनडा भारताकडून आभूषण, महागडे दगड, फार्मा प्रोडक्ट, रेडिमेड गारमेंट, ऑर्गेनिक केमिकल्स, लाइट इंजीनियरिंग सामान आणि आयर्न अँड स्टील प्रोडक्ट प्रामुख्याने विकत घेतो. त्याचवेळी कॅनडा भारताला डाळी, न्यूजप्रिंट, वुड पल्प, एस्बेस्टस, पोटाश, आयरन स्क्रॅप, खनिज आणि इंडस्ट्रियल केमिकलची विक्री करतो. दोन्ही देशांमध्ये व्यापार जवळपास सारखाच आहे. या तणावाचा परिणाम व्यापारावर सुद्धा होऊ शकतो.