नवी दिल्ली : कॅनडाने हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा मुद्दा लावून धरला आहे. भारतावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या हत्येमाग भारत सरकारचा हता असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलाय. हरदीप सिंह निज्जरची 18 जूनला कॅनडात भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडून हरदीप सिंह निज्जरला संपवलं. निज्जर वाँटेड दहशतवादी होता. भारतविरोधी कारवायांमुळे तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच्यावर 1 लाख रुपयाच इनाम होतं. अशावेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कुठल्याही पुराव्याशिवाय भारतावर थेट आरोप केले. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. सध्या दोन्ही देशांच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झालाय. राजनैतिक स्तरावर परस्परांविरुद्ध कारवाई सुरु आहे. परस्परांचे डिप्लोमॅट्स निष्कासित केले.
भारताने आज त्यापुढे जाऊन एक पाऊल टाकलं. . भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली आहे. भारताकडून आतापर्यंतची ही सर्वात मोठी Action आहे. भारताने सुद्धा कॅनडा विरोधात रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात हा तणाव आणखी वाढू शकतो. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अनेक खलिस्तान समर्थकांनी कॅनडात आश्रय घेतला आहे. कॅनडाच्या राजकारणात खलिस्तानच समर्थन करणाऱ्या राजकारण्यांच एक स्थान आहे. त्यामुळे तिथून सरार्स भारतविरोधी कारवाया सुरु असतात. त्यालाच मोदी सरकारचा विरोध आहे. याच कट्टरपंथीयाविरोधात जस्टिन ट्रूडो यांनी कारवाई करावी अशी मोदी सरकारची मागणी आहे. पण जस्टिन ट्रूडो आपल्या व्यक्तीगत फायद्यासाठी अशा खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहेत. त्यामुळे दोन्ही देशात तणाव वाढत चाललाय.
कोण होत्या करीमा बलोच?
आज जस्टिन ट्रूडो सरकार हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन मोठा गदारोळ करतय. पण याच कॅनडामध्ये करीमा बलोचचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या बद्दल जस्टिन ट्रूडो एक शब्दही बोलायला तयार नाहीयत. करीमा बलोच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती. बलुचिस्तानात पाकिस्तानकडून जुलमी राजवट राबवली जाते. त्या विरोधात करीमा बलोच आवाज उठवत होत्या. लढत होत्या. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात स्वातंत्र्यासाठी लढाई सुरु आहे. पाकिस्तानकडून करीमा बलोच यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. अखेर करीमा बलोच पाकिस्तानसोडून कॅनडाला निघून गेल्या. मात्र, तिथेही धमक्यांनी त्यांची पाठ सोडली नाही.
त्या परतल्याच नाहीत
एक दिवस करीमा बलोच घरातून बाहेर पडल्या, त्या परतल्याच नाहीत. नदी किनारी करीमा बलोच यांचा मृतदेह मिळाला. करीमा बलोच यांनी स्वत:च जीवन संपवलं, असं कॅनडा पोलिसांनी सांगितलं. कुटुंबाचा पाकिस्तानवर आरोप होता. काही दिवसात ही केस बंद झाली. इतक्या मोठ्या महिल्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्यावर कॅनडा सरकारने एक चकार शब्द काढला नाही.